आशाताई बच्छाव
डॉ.विवेक देशमुख यांनी आपल्या कृतार्थ जीवनाची सामाजिक रुग्ण सेवेत 12 वर्ष पूर्ण केली त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील समाजातील गरीब व गरजू रुग्णांना त्यांच्या विविध शस्त्रक्रिया अल्प दरात व मोफत करून देण्याचे महान कार्य केले आहे. आतापर्यंत 15000 पेक्षा ही जास्त गरजू रुग्णांना डाॅ.विवेक देशमुख मुळे जीवदान मिळू शकले आहे .त्यांच्या या महान सेवेबद्दल, तसेच आपण जोपासलेल्या या सेवाभावी वृत्तीचा समाजसेवेचा व आदर्श रचनात्मक कार्याचा, गौरव व्हावा, याचा सगळयांना खूप सार्थ अभिमान आहे
डॉ.विवेक देशमुख यांनी आपल्या आई वडीलांचे स्वप्न केले ,त्यांच्या आई वडीलांनी खूप मेहनतीने त्यांना लहानाचे मोठे केले आणि एकच स्वप्न बघितले डोळ्यात की माझ्या मुलाने डॉक्टर बनून गरीब रुग्णांची सेवा करावी .ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास आपण आपल्या प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
1) सर आपले बालपण कसे गेले?
– वानखेड तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा येथे माझा जन्म झाला, तसेच
अभ्यास करुन माझे मी शिक्षण पूर्ण केले.
वडील माझे शेतकरी होते परंतु, इतर मुलांसारखे माझे बालपण खेळण्यात कधीच गेले नाही.
2)या क्षेत्रात येण्यामागचे कारण काय?
– स्वप्निल तू खूप छान प्रश्न विचारला , रूण सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे
कोणत्याही व्यक्तीचा पैशाअभावी मृत्यु होऊ नये हे कारण डोळ्यासमोर ठेवून मी डॉक्टर पेशात आलो.
3)सर आपल्याला कोणाकडून प्रेरणा मिळाली?
-मला प्रेरणा माझ्या काका सुभाषराव देशमुख व वडीला यांच्याकडून मिळाली. व मी डॉक्टर बनून गरीबांची सेवा करावी अशी माझी इच्छा होती आज मी माझ्या काका व वडील यांची इच्छा पूर्ण केली.
4)शस्त्रक्रिया करण्याचा खर्च खूप आहे आणि या शस्त्रक्रिया तुम्ही अल्प दरात करून देतात ते कसे शक्य होते?
स्वप्निल पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री निधी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यनिधी, यासारख्या विविध सरकारी योजनांतून गरीब रुग्णांना आर्थिक मदत होते.
5) तरुण वयात हृदयविकार वाढण्याचे कारण कोणते आहे?
-तरुण पिढीचे आयुष्य धावपळीत जाते तसेच हल्ली फास्टफूडचे सेवन मोठ्या प्रमाणात होते त्याचप्रमाणे कामाच्या व्यापात ,व्यक्ती स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. व्यायामाचा अभाव, दारू सिगारेट गुटखा यांचे सेवन जास्त, अशी अनेक कारणे आहेत.
6)सर आपण डाॅक्टर आणि समाजसेवक या दोन्ही भूमिका कशा प्रकारे पार पाडतात?
-डाॅकटरी हा माझा पेशा आहे, पण मी समाजसेवाला जास्त प्राधान्य देतो, समाजामध्ये खूप गरजू रुग्ण आहेत,जे पैसे अभावी उपचार करू शकत नाही ,त्यांना आर्थिक मदत मिळवून त्यांचे उपचार प्राधान्याने करावे हेच माझे मूळ धोरण आहे,वे ते मी मनापासून आनंदाने करतो, समाजसेवा करणे हे मी माझे कर्तव्य समजतो,आणि सामाजिक बांधिलकी जपून रुग्णांना जास्तीत जास्त मदत करत आहे .
बाँक्स
त्यांचे महत्त्वाचे निवेदन
उत्तम सेवा,
श्री हाँस्पिटल वरवट बकाल चे संचालक डाँ विवेक देशमुख B. A. M. S, C. जनरल फिजीशियन व बालरोग चिकित्सा
यांच्याशी संपर्क साधावा
मोबाईल नंबर -9552381088