
आशाताई बच्छाव
गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्ग तात्काळ दुरुस्ती करा
– लिलाधर भरडकर (जिल्हा अध्यक्ष रा.यु.काँ ).
मागील सहा महिन्यापासून अपघाताच्या प्रमाणात झाली वाढ
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : मागील वर्षभरापासून गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे सदर महामार्गावर अपघाताचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले असून हा महामार्ग जीवघेणारा महामार्ग ठरलेला आहे. या महामार्गावरुन राज्याची उपराजधानी नागपूर शहराला गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग असून सदर महामार्गाची रुंदी राज्य महामार्ग ऐवढीच असून या महामार्गाची राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे रुंदीकरण करण्यात यावे तसेच या राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण करण्याची गरज आहे. कारण की, जिल्ह्यामधून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या खुप प्रमाणात वाढली असून सदर प्रकारावर जिल्हा परीवहन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याच अवजड वाहतूक वाहनांमुळे गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे खराब झालेला आहे तरी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग् मंत्रालयानी लवकरात लवकर गडचिरोली ते आरमोरी व नागभीड ते उमरेड राष्ट्रीय महामार्गाचे लवकरात लवकर मजबुतीकरण व नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोलीचे अधिकारी हे मुख्यालयात उपस्थित राहत नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग दुर्लक्षीत करीत आहेत. सदर राष्ट्रीय महामार्ग् हे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे अन्यथा या महामार्गावरील अवैध जडवाहतूक रोकण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी दिला आहे.