आशाताई बच्छाव
रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे फोटोग्राफी दिन साजरा रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे आज जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला. यानिमित्त एमआयडीसी विश्रामगृहामध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्ष तथा ज्येष्ठ फोटोग्राफर अजय बाष्टे आणि पदाधिकारी, सदस्यांनी कॅमेऱ्याचे पूजन केले. त्यानंतर दिवंगत फोटोग्राफर्सना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
संस्थेतर्फे काही महिन्यांत फोटोग्राफर्ससाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. फोटोग्राफर्सच्या हितासाठी मार्गदर्शन, सेमिनार, कार्यशाळा, प्रदर्शन आदींचे आयोजन करण्याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. तसेच दहीहंडीनिमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेसंदर्भात चर्चा करण्यात आली. आपली संस्था शासनमान्य असून जिल्ह्यातील छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर्सनी संस्थेत सहभागी व्हावे, असे आवाहन अजय बाष्टे यांनी या वेळी केले. आजच्या कार्यक्रमात दहा नवीन फोटोग्राफर्सनी संस्थेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यांचे स्वागत या वेळी करण्यात आले.
पुढील वर्षभर होणाऱ्या विविध उत्सव, सणांमधील फोटोग्राफी स्पर्धासुद्धा घेण्यात येणार आहे. एकूणच रत्नागिरी जिल्ह्यात सण, उत्सवांचे छायाचित्रणाच्या माध्यमातून अनोखे मार्केटिंग केले जाणार आहे, यासंदर्भातही नियोजन या वेळी अध्यक्ष अजय बाष्टे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या वेळी सुबोध भुवड, संजय देवरुखकर, साईप्रसाद पिलणकर, परेश राजिवले, हर्षल कुलकर्णी, भूषण केळकर, समीर जुवेकर, प्रसाद जोशी अमित आंबवकर, अनुपम तिवारी, प्रदीप हरचिरकर, नीलेश कोळंबेकर, अमर शेठ, राकेश बोरकर, अनिकेत जाधव, ओम पाडाळकर, अमिता साळवी, प्रशांत निंबरे, शिरीष तारवे यांच्यासह अनेक फोटोग्राफर्स उपस्थित होते.
दहीहंडी फोटोग्राफी स्पर्धेला प्रतिसाद
संस्थेतर्फे आयोजित दहीहंडी फोटोग्राफी स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याकरिता आज २० ऑगस्टला रात्री १० वाजेपर्यंत फोटो rdpvphotographers@gmail.com या इमेल आयडीवर पाठवायचा आहे. स्पर्धेसाठी फोटो ८ बाय १२ इंचाचा व ३०० रिझोल्यूशनमध्ये असावा. मोबाईलमधून काढलेल्या फोटोंच्या गटासाठी अनुक्रमे १५००, १००० आणि ७५० अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच व्यावसायिक गटासाठी अनुक्रमे ३०००, २००० आणि १००० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.