आशाताई बच्छाव
पंढरपूर पोलिसांची दमदार कामगिरी दोन आरोपींसह 50 मोबाईल हस्तगत.
माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दमदार कामगिरी केली दोन आरोपींसह 50 चोरीतील मोबाईल हस्तगत केले आहेत. दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपासात गति दिली आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी पत्रकार परिषद दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर शहरातील एका नागरिकाने मोबाईल चोरीला गेल्या असल्याची तक्रार पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली होती
त्याचा तपास करत असताना,
हा मोबाईल सांगोल्यातील एक नागरिक वापरत असल्याने समजले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हा मोबाईल दुसऱ्या व्यक्तीकडून घेतला असल्याने सांगितले आणि तपास गती मिळाली सांगोला तालुक्यातील पारे येथून सदर इसमास ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता सदरचा मोबाईल जप्त करण्यात आला याप्रकरणी पारेवाडी येथील आरोपीस ताब्यात घेऊन आणखी चौकशी केली असता त्यांनी त्याच्या साथीदारांची माहिती दिली. त्यासही ताब्यात घेण्यात आले सदर दोन्ही इसमांची कसून चौकशी करून त्यांच्याकडून 49 अधिक 1असे 50 मोबाईल हस्तगत करण्यात आले. या दोन्ही आरोपींवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे