Home नंदुरबार सहा वेळा निवडून येणारे डॉ.विजयकुमार गावीत झाले चौथ्यांदा मंत्री..   

सहा वेळा निवडून येणारे डॉ.विजयकुमार गावीत झाले चौथ्यांदा मंत्री..   

104
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0011.jpg

सहा वेळा निवडून येणारे डॉ.विजयकुमार गावीत झाले चौथ्यांदा मंत्री..                                                @. जिल्हा प्रतिनिधी:- सागर (गणेश) कांदळकर ज्येष्ठ नेते डॉ.विजयकुमार गावीत यांनी मंगळवारी चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अपक्षापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा राहिला आहे. २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. या पक्षात त्यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले आहे.

राजकारणाचा मोठा वारसा असलेल्या डॉ.विजयकुमार गावीत यांनी शासकीय नोकरी सोडून १९९५ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी त्यावेळी पहिल्यांदाच अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राज्यातील तत्कालिन भाजप-शिवसेना युती सरकारला त्यांनी पाठींबा दिला होता. विशेषत: नंदुरबार जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा केला. त्याचदरम्यान त्यांना युती सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळाले आणि पुढे काही दिवसातच जिल्ह्याची निर्मितीही झाली. त्यामुळे जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.१९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्या पक्षातर्फे निवडणूक लढवली. त्यावेळीही ते मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी झाले आणि आघाडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. त्यांना आदिवासी विकास विभाग खाते मिळाले होते. त्या माध्यमातून त्यांनी कामाचा सपाटा सुरू केला. त्यांची कारकीर्द पुढे वादातीतही ठरली. पण आदिवासी विकासमंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्याच कामाच्या बळावर २००९ मध्ये देखील ते विधानसभा निवडणूक जिंकले आणि पुन्हा तिसऱ्यांदा मंत्री झाले. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन आणि पर्यटन विभागाची जबाबदारी सांभाळली.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या डॉ.हीना गावीत यांना भाजपतर्फे लोकसभेची उमेदवारी मिळाली व त्या निवडूनही आल्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ.गावीत यांनीही भाजपतर्फे उमेदवारी केली. सलग पाचव्यांदा ते विजयी झाले. पण तेव्हा मात्र त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. २०१९ मध्येही सलग सहाव्यांदा झाले. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. आता भाजप व शिवसेना शिंदे गटाचे युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना चौथ्यांदा मंत्रीपद मिळाले आहे.

Previous articleमांगीतुंगी भिलवाड येथे क्रांतीदिवस आदिवासी दिन उत्साहात साजरा
Next articleशेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here