आशाताई बच्छाव
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड –
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड व नगर परिषद , मुखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभिनव उपक्रमांतर्गत ” हर घर तिरंगा ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी धनंजय थोरात , मराठी विभाग प्रमुख प्रा.चंद्रकांत साखरे , व्यासपीठावर स्टाँफ सेक्रेटरी प्रा.डॉ. दिलीप आहेर , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. मधुकर राऊत , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एकलारे चंद्रकांत , डॉ. भारत केंद्रे , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी , नगर परिषद कर्मचारी डांगे , बनसोडे ,कांबळे हे होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. विजय वारकड तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. सी.एम.कहाळेकर यांनी केले . राष्ट्रध्वज विक्री करण्यासाठी स्टाँल लावण्यात आले होते . त्याप्रसंगी 375 इतके ध्वज एकदाच विक्रीचा हा विक्रम या महाविद्यालयात झाला आहे . दि.12 आँगस्ट रोजी महात्मा फुले महाविद्यालय व नगर परिषदेकडून प्रभातफेरीची जय्यत तयारी सुरू झाली आहे .
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी थोरात यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाची माहिती , नियमावली , राष्ट्राभिमान आणि सामाजिक बांधिलकी याविषयावर प्रकाश टाकला . अध्यक्षीय भाषणात डॉ. अडकिणे यांनी राष्ट्रीय अस्मिता , सामाजिक जाणीव , हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव साजरा करताना घ्यावयाची काळजी आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी मिळालेली संधी इत्यादी विषयावर प्रकाश टाकला आहे . याप्रसंगी बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते .