Home नांदेड मुखेड महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जनआक्रोष अवास्तव बिले,मनमानी कारभाराविरोधात मुखेडकरांनी दिले निवेदन

मुखेड महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जनआक्रोष अवास्तव बिले,मनमानी कारभाराविरोधात मुखेडकरांनी दिले निवेदन

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0025.jpg

मुखेड महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जनआक्रोष

अवास्तव बिले,मनमानी कारभाराविरोधात मुखेडकरांनी दिले निवेदन

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड महावितरणच्या भोंगर कारभाराविरोधात मुखेडात जनआक्रोष पाहायला मिळाला यात दि. ०५ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना तहसिलदार मुखेड मार्फत मुखेडकरांनी घोषना देत निवेदन दिले.

यात मुखेड महावितरण कंपनीचा विद्युत ग्राहकांना नियमित विज भरणा करुनही अवास्तव विद्युत देयके देणे, विद्युत पुरवठा नियमितपणे न देणे, पुर्वसुचना न देता विद्युत पुरवठा खंडीत करणे व शहरातील डि. पी. महावितरण कंपनीची परवानगी न घेता परस्पर बदलणे, ग्राहकांना नाहक मनस्ताप देणे, मनमानी कारभार करणे,ग्राहकांशी हुज्जत घालणे या गंभीर प्रकरणी जिल्हा कार्यकारी अभियंता ताबडतोब लक्ष घालावे स्थानिक निष्क्रिय कनिष्ठ अभियंताची तात्काळ बदली करावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नियमीतपणे बिल भरण्याऱ्या ग्राहकांना अवास्तव हजारो रुपयांचे अंदाजे बिले देऊन सक्तीची वसुली महावितरण करीत असुन मागील दोन वर्षापासुन कोरोनाचा काळ आणि त्यात महावितरणकडून अव्वाच्या सव्वा बिले घरात कोणीही नसताना मनमानी कारभार करुन विज पुरवठा खंडीत करीत आहेत. अशा मनमानी कारभाराविरोधात गंभीरपणे चौकशी करुन विज ग्राहकांना दिलासा दयावा अन्यथा दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी धरणे आंदोलन करु इसा इशाराही यावेळी देण्यात आला.

चौकट

यावेळी माजी नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक, शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे, दत्तात्रय चौधरी , ज्ञानेश्वर डोईजड, संदिप पिल्लेवाड, शिवशंकर पाटील कलंबरकर, प्रा. विठठल इंगळे, अॅड गोविंद डुमणे, साईनाथ बोईनवाड ,बबलु शेख, प्रमोद मदारीवाले, अदनान पाशा, नागनाथ पाटील बेळीकर, नागेश लोखंडे, कैलास राहेरकर,आर.जी.बोडके,सय्यद गौस सलगरकर, काशिनाथ येवते, प्रभाकर कागदेवाड,मारोती घाटे, साई भांगे,केशव गायकवाड, मिलिंद भद्रे,संतोष कमठेवाड, सुरज रत्नपारखे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर अनेक नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleजांब,बाऱ्हाळीसह मुखेड शहरात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवा -काँग्रेसची मागणी
Next articleमहात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here