Home मराठवाडा अल्पसंख्याक मुलींनी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीचे लाभ घ्यावे. सय्यद मिनहाजोद्दीन

अल्पसंख्याक मुलींनी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीचे लाभ घ्यावे. सय्यद मिनहाजोद्दीन

78
0

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0053.jpg

अल्पसंख्याक मुलींनी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीचे लाभ घ्यावे. सय्यद मिनहाजोद्दीन

बीड (युवा मराठा न्युज नेटवर्क) अल्पसंख्याक मंत्रालय मार्फत बेगम हजरत राष्ट्रीय शिष्यवृत्ती चे मुलींनी जास्तीत जास्त फॉर्म भरावे असे आवाहन मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन यांनी केले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय मार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती अल्पसंख्याक मुलींसाठी मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती नववी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या सर्व अल्पसंख्याक मुलींसाठी लागू आहे. नववी ते दहावी वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी पाच हजार रुपये (5000) व अकरावी ते बारावी वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी सहा हजार रुपये ते 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची कलावधी 21 जुलै ते 10 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. अर्ज भरण्या साठी लागणारे कागदपत्र पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थिनीच्या आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल सोबत असणे मागच्या वर्षीच्या गुणपत्रक मार्क मेमो उत्पन्न प्रमाणपत्र वडील किंवा आईच्या असावा विशेष म्हणजे इतर शिष्यवृत्तीधारक बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेच्या फॉर्म भरू शकत नाही. धार्मिक अल्पसंख्याक किंवा वेगम हजरत महल फक्त एकच स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात अधिसूचनेनुसार मुस्लिम ख्रिश्चन बुद्ध पारसी आणि जैन या अल्पसंख्याक मुलींसाठी लागू राहील कमीत कमी 50 टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थी ना शिष्यवृत्ती दिली जाईल. या योजनेचा लाभ अल्पसंख्याक विद्यार्थिनी घ्यावे असे आवाहन मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन यांनी केले आहे.

 

Previous articleजव्हार तालुक्यात अतिवृष्टीचा फटका,घरांची पडझड आदिवासी बांधवांचे संसार उघड्यावर. जिवितहानी नाही
Next article🇮🇳 हर घर तिरंगा, घर घर तिरंगा 🇮🇳 .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here