Home Breaking News ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले सुप्रीम कोर्टाच्‍या...

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे स्‍वागत.

63
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220720-WA0014.jpg

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे स्‍वागत.

हे भाजपाच्‍या सातत्‍यपूर्ण पाठपुराव्‍याचे यश.

राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील निवडणूकीतील ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्‍य केला आहे. सुप्रीम कोर्टाच्‍या या निर्णयाचे आपण स्‍वागत करीत असून भारतीय जनता पार्टीने यासंदर्भात सातत्‍याने केलेल्‍या पाठपुराव्‍याचे हे यश असल्‍याचे मत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केले आहे.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्‍याचा प्रश्‍न दिर्घकाळ प्रलंबित होता. हा प्रश्न निकाली निघावा म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने प्रयत्न केले . श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधींना महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळेल. राज्यात ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या, २४१ नगरपालिका, २७ महापालिका, १२८ नगरपंचायती आणि २७८३१ ग्रामपंचायती आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्यास महापालिकांमध्ये बाठिंया आयोगानुसार २६ टक्के आरक्षणाप्रमाणे ७ महापालिकांचे महापौर पद ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधीला मिळेल. राज्यातील २४१ नगरपालिकांपैकी २७ टक्के ओबीसी आरक्षणाप्रमाणे ६६ नगरपालिकांचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होईल. १२८ नगरपंचायतीपैकी ३७ ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव असेल. नगरपंचायतीमध्ये देखील ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळेल.

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत भारतीय जनता पार्टीने ओबीसी बांधवांना दिलेला शब्‍द पाळला असल्‍याची प्रतिक्रिया आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

Previous articleवन महोत्सव अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण
Next articleओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे स्‍वागत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here