Home वाशिम कोंडाळा येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

कोंडाळा येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0015.jpg

कोंडाळा येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक                   वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

वाशीम तालुक्यातील कोंडाळा येथे गीताई ह्यूमन काइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट द्वारा संचलित डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने खरीप पूर्व आढावा व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते या सभेला कोंडाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच रामदास अशोक झामरे,गावकरी रामदास दाजीबा झामरे,विक्रम झामरे, मा.सरपंच गजानन मानवतकर व इत्यादी गावकरी उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी शुभम परमेश्वर वाकुडकर व सूर्यकांत राजेंद्र खाडेया विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले व शेतकऱ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन केले या वेळी उपस्थितांना सोयाबीन पिकाची सविस्तर माहिती देण्यात आली व सोयाबीन पेरणी मध्ये सरी वरंबा, बीबीएफ पटा पद्धत, अमृतसरी यांचे महत्त्व शेतकर्‍यांना सांगितले खताच्या मात्रा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.या वेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.जाधव, प्रा.प्रदीप निचळ , डॉ रविन्द्र करंंगामी व प्रा.अंकुश वाठोरे, प्रा.अरुण वाघ, प्रा.एस. बी.वाकुडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Previous articleभारतीय जनता पार्टी तर्फे अनुसूचित जनजाति मोर्चा चे मुंबई येथे
Next articleपालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई –मुंबई अहमदाबाद महामार्गावर दमन दारूचा ट्रेलर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here