आशाताई बच्छाव
⏹️वाढीव दराने खते विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर तात्काळ कार्यवाही करा – गिरिधर पा.केरूरकर
▶️संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांवर तात्काळ कार्यवाही करण्याची छावा संघटनेची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी .
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – सद्याला शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीचा हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी
खते व बी. बियाणे घेण्यासाठी गर्दी करित असतानाच दुसरीकडे मात्र कृषी दुकानदारांकडून खते व बियाणे चढ्या दराने विक्री करीत आहेत. सबंधित कृषी अधिकारी व कृषी दुकानदारांची मिलीभगत असल्याचा संशयही शेतकरी वर्गातून केला जात आहे.
केरुर ता. मुखेड येथील युवा शेतकरी भाऊसाहेब हरीचंद्र पाटील शिंदे यांनी मुखेड येथील
ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र, सुनिल कृषी ,व बालाजी कृषी सेवा केंद्र या दुकान मालकांनी मनमानी करुन खतांची ज्यादा भावाने विक्री केली. प्रत्यक्ष भाऊसाहेब हरिशचंद्र शिंदे रा.केरुर हे ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र नवा मोंढा मुखेड येथे खत घेण्यास गेले असता डि.ए.पी खत सुमारे पंधराशे दहा रुपये (१५१० रु ) भावाने पैशाची मागणी केल्याचे व्हिडीओ चित्रीकरण तक्रारदार यांच्याकडे उपलब्ध असून, त्या तारखेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर यांना निवेदन देवून चढ्यादरांने खतांची विक्री करणाऱ्या संबंधित कृषि दुकानदारांची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करून दुकानांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.