Home गडचिरोली माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ नामदेवराव उसेंडी यांचे अध्यक्षतेखाली भागवत सप्ताह...

माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ नामदेवराव उसेंडी यांचे अध्यक्षतेखाली भागवत सप्ताह व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडले.

71
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220413-WA0076.jpg

माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ नामदेवराव उसेंडी यांचे अध्यक्षतेखाली भागवत सप्ताह व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडले.

गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली तालुक्यातील गिलगाव बाजार येथे दिनांक १२/०४/२०२२ मंगळवार ते दिनांक १६/०४/२०२२ शनिवार पर्यंत गिलगाव बा. येथे हनुमान जयंती निमित्य. नवीन हनुमान मंदिराच्या भव्य आवारात ५ दिवसीय भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
भागवतकार संतमहंत राजयोगी श्री विजयानंद रोडे महाराज यांचे अमृतमय वाणीद्वारे गुरुगीता श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यासाठी गिलगाव ( बा. ) ग्रामवासीयांनी कीर्तन फेरीत मोठया संख्येने भाग घेतला. गिलगाव बाजार गावातील ग्रामस्थ परिसरातील भविकभक्त एकत्रित येऊन सहभागी झाले. हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व भागवत सप्ताहाच्या निमित्याने संपूर्ण गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेे.
यावेळी विशेष अतिथी माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी म्हणाले की माणसांनी माणसाप्रमाणे जगावं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग जर कोणी दाखवत असेल तर ते भागवत सप्ताहाच्या माध्यमातून व त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून होत असतो.
विशेष अतिथी उपाध्यक्ष जी.काँग्रेस कमिटी अनिलभाऊ कोठारे, प.स.सदस्य गडचिरोली रामरत्नजी गोहणे, केशवराव काळबांधे गुरुजी, प्रमुख पाहुणे सरपंच ग्रा.प. गिलगाव अशोक कुळमेथे, त.मु.अध्यक्ष अशोक मेश्राम, रत्नाकर हर्षे, उद्धव रामटेके, प्रदीप खरवडे, चौधरी दुकानदार, रामदास हर्षे, फुलझले साहेब, सुकिराम खेडेकर, ऋषीजी आवारी, धोंडूजी मेश्राम, मोरेश्वर सेरकी, एकनाथ खोडवे, रामजी मेश्राम, आदी बहुसंख्येने गिलगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन श्री देवनाथ हर्षे यांनी केले. व शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन श्री देवनाथ हर्षे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here