राजेंद्र पाटील राऊत
स्त्री – पुरूष समानता देखावा की वास्तव? “आज जागतिक महिला दिन! त्यानिमित अंतर्मुख करायला लावणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी लिहलाय गडचिरोली येथील “युवा मराठा”च्या वाचक वैष्णवी महेश बोबडे यांनी….प्रस्तुत आहे महिला दिनानिमित सदरचा लेख..-व्यवस्थापकीय संपादक”
अनेक साहित्यातून स्त्री- पुरुष समानते बद्दल वाचत आलो आहोत. अनेकदा लोकांकडून ऐकत सुध्दा आलो. पण प्रत्यक्षात असणारा फरक आपल्या लक्षात येतो. समानतेच्या या गोष्टी जेवढ्या लिहल्या आणि बोलल्या जातात तेवढ्या मात्र प्रत्यक्षात स्वीकारल्या जात नाही. पूर्वी पासूनच पुरुषप्रधान असलेला आपला समाज ज्यात स्त्रीला नेहमी दुय्यम स्थान दिलं गेलं आहे, त्या समाजात स्त्रीला बरोबरीचा हक्क द्यायला सुध्दा काहीतरी वेगळं केल्याची भावना निर्माण करते, कारण तिला नेहमी जशी आत्तापर्यंत होती तशीच पहायची सवय सर्वांना झाली आहे. त्यामुळं तीचे खांद्याला- खांदा लाऊन चालचे अनेकांना न पटणार असणारच. तरीही अलीकडील काही वर्षात स्थिती बरी झाली पण 21 व्या शतकात वास्तव्य करणाऱ्या स्त्रीला जेवढ्या मुभा मिळायला हव्या तेवढ्या अजुनही मिळाल्या नाही.
आपण बघतो जेवढ्या आनंदाने मुलाच्या जन्माचे स्वागत केले जाते तेवढ्या आनंदाने मुलाच्या जन्माचे स्वागत केले जाते तेवढ्या आनंदाने मुलीच्या जन्माचे स्वागत केले जात नाही. स्त्रीभृणहत्ये सारखे प्रकार घडतात. मुलांना वंशाचा दिवा समजला जातो. म्हातारपणाचा आधार समजला जाते पण वृध्दाश्रमात जाणारे पालक सुध्दा आपण बघतोच मग मुलगा कसा आधार समजायचा आणि कित्येक मुली आज पालकांना आधार देताना दिसतात. कधी कोणी मुलीला वंशाला पणती झाली असा उल्लेख करत नाही.
देशाला आपण भारत माता म्हणतो म्हणजे स्त्री ची उपमा देतो, नऊ दिवस स्त्रिरूपी नऊदुर्गेची पूजा करतो आणि दुसरी कडे तिचाच छळ करतो, तिला त्रास देतो. आई बहिणीच्या नात्याच्या शिवा सुध्दा देतो. लग्नाच्या वेळी मुलाच्या मुलीकडून खूप अपेक्षा असता. मुलगा कसाही असो तू सांभाळून घे याच शब्दात तिला स्मजवल जात. घटस्फोटा झाल्यास चूक सुध्दा महीलेचीस गृहीत धरल्या जाते, कारण वर्षणुवर्ष स्त्री त्रास सहन करते पण नात तोडत नाही तेच सर्वांना अपेक्षित असतं आणि त्यापेक्षा काही वेगळं वागणाऱ्या स्त्रीवर दोष दिले जातात. लग्नाच्या वेळीची हुंडा पद्धती जी कायद्याने गुन्हा आहे ती अजूनही अस्तित्वात आहे फक्त तीच स्वरूप बदललं आहे आणि प्रत्येक वर पक्षाल अपेक्षा असते मुलीच्या घरून काही मिळावं पण कधी कोणत्या वरपक्षला मुलीच्या घरी काही देताना किंवा द्यायचा विचार करताना सुद्धा आपण बघत नाही.
आजची स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करते असे कुठलेच क्षेत्र नसेल ज्यात स्त्री नाही आज प्रत्येक क्षेत्र स्त्री ने तिच्या कर्तृत्वाने गाजवले आहे. पण स्त्री बाहेर कितीही काम करत असली तरी घरकाम मात्र तिने एकटीनेच करायचे, घरकाम आणि बाहेरची नौकरी अशी दुहेरी भूमिका जेव्हा घर दोघांचं घरातली माणसं दोघांची तर घर सांभाळण्याची जबाबदारी एकट्या स्त्री वरच का? मुलांना जन्म स्त्री देते पण संगोपनाची जबाबदारी सुध्दा तिच्याच वर का? पालक तर दोघेही असतात . घरावर पाटी पुरुषाच्या नावाची आणि घर सांभळायच स्त्री ने, आणि पाटी वर जरी स्त्री च नाव असल तरी हक्क मात्र पुरुषाच्या निम्मा च असतो. सगळे स्त्री ला विचारतात घरचे मालक कुठ गले?
घरात सर्वांना आदर देणं, सर्वांची काळजी घेणं, सर्वांकडे त्याच्या आवडीनिडी पासून तर आरोग्यापर्यंत ची काळजी करताना आपण स्त्री ला बघतो. कधी कोणत्या पुरुषाने त्याला स्त्री कडून मिळालेला एवढा आदर तिला देताना बघायला मिळत नाही आणि अस देत असेल तरी फार कमी पुरुष देतात. आवाज वाढवून बोलण्याचा अधिकार मात्र पुरुषाला असतो, स्त्री आवाज वाढवून बोलली की लगेच तिच्या संस्कारावर प्रश्न केले जातात. पुरुषाच्या मोठ्यात मोठ्या चुकांचे पाठपुरावा घरातील इतर सदस्यांकडून केले जातात. आणि स्त्री ची एक लहान चूक सुध्दा पचवून घ्यायला कोणी तैयार नसत. चूक तर चूक तिच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन लिंगापरत्वे का बदलतो? दोघांच्या चुका कडे बघण्याचा सारखा मापदंड का नको?
लहानपणीपासूनच स्त्री ला शिस्तीत वागायला सांगितलं जातं. कसं वागावं, कसं बोलावं, जास्त बोलू नये, जास्त हसू नये कपडे कशे घालावे, इथपासून सगळ शिस्तीच्या नावाखाली शिकवलं जात. पण यातल काही तरी मुलांना शिकवलं जातं का? नीट वाग दुसऱ्याच्या घरी जायचं आहे उद्या सासर चे लोक काय बोलतील अस जवळजवळ सर्वच मुलींना हे ऐकायला मिळत, पण नीट वाग दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी येणार आहे उद्या ती काय म्हणेल अस कोणी मुलांना शिकवत नाही. मुलींच्या जास्त मोकळं होऊन बोलण्याचा किंवा जास्त हसून बोलण्याचा मुल वेगळे वेगळे अर्थ घेतात म्हणून जास्त मोकळं होऊन बोलायचं नाही, मुलींच्या कपड्यावरून त्यांचं चारित्र्य समजतात म्हणून व्यवस्थित कपडे घालायचे मुलांना आकर्षित करणारे कपडे घालायचे नाही, सगळे बदल मुलिंनीच कराचे तर मुलांचा दृष्टिकोन कधी बदलायचा ?
प्रत्येकाला माहीत आहे आज बाहेरचा वातावरण महीलेकरित्ता/ मुलींकरीता असुरक्षित आहे. म्हणून प्रत्येक मुलीला घरी परतण्याची वेळ पालक वर्गाकडून मिळते अर्थात काळजीपोटी बंधने घातली जाते. पण जिच्या वर अत्याचार होत आहे तिला परतण्याची वेळ दिली जाते आणि जे अत्याचार करत आहे त्यांच्या घरी परतण्याची वेळ कोण ठरवणार? त्यांच्या वर अजिबात बंधन नाही ते मोकळे आहे कधीही कुठ यायला जायला. कामाच्या ठिकाणी, गल्ली मधे किंवा रस्त्यावर मधातच कुठे तरी बस मध्ये रेल्वे च्या प्रवासादरम्यान कुठंही स्त्रीला त्रास दिलं जाऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी ती अंदाज सुध्दा लावू शकत नाही की तिला कधी कोण त्रास देईल, कोणी सतत बघून तर कोणी पाठलाग करून कसाही त्रास तिला दिला जातो. स्त्री ला त्रास देऊन तिला छळून स्वतःचा पुरुषार्थ दाखवणारे पुरूष म्हणजे समाजाची शोकांतिका च म्हणावी. लोकांसमोर स्त्रिवर होणारा अत्याचार 4 लोक पाहतात पण मदतीला कोणी येत नाही. कधीच कोणत्या स्त्री कडून सार्वजनिक ठिकाणी पुरुषाचा छळ होत नाही, चार मुली मिळून कधी कोणत्या पुरुषाला त्रास दिल्याचं ऐकायला मिळत नाही. हा अत्याचार फक्त कमजोर समजणाऱ्या वर्गावर केला जातो म्हणजे पुरुषाकडून स्त्री वर केला जातो.
आपण आत्ता सर्वांना पाश्चात्य संस्कृती चे अनुकरण करताना बघतो, त्यांचे कपडे, त्यांची जीवनशैली आणि बऱ्याच गोष्टी चे अनुकरण होताना आपण आजूबाजूला पाहतो. मग त्यांच्या विचारसरणीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न आपण का करत नाही? तिथं सर्वांना समान दर्जा दिला जातो ते आपण बघत नाही तिकडे व्यक्ती स्वतंत्र जपलं जातं, व्यक्ती चा दर्जा त्याच्या कामावरून किंवा लिंगा वरून केला जात नाही. ते अनुकरण आपल्याकडे का होत नाही?
जेव्हा पर्यंत स्त्रीला पुरुष स्वतःबरोबर समजत नाही तिला कमी लेखन बंद करत नाही तेव्हा पर्यंत तिच्या वर होणारा अत्याचार बंद होणार नाही, आणि समानतेचा विचार करण अशक्य आहे. ज्याप्रमाणे एखादे रथ/ वाहन सुरळीत चालण्यासाठी त्याची दोन्ही चाके सारखी असावी लागतात त्याचप्रमाणे, स्त्री व पुरुष हे दोघे ही समान होतील तेव्हा एक पोषक व सुरक्षित समाज निर्माण होईल आणि विकासारुपी रथाला योग्य वेग येईल.
वैष्णवी महेश बोबडे
7620869761