
राजेंद्र पाटील राऊत
नगर परिषद मुख्याधिकार्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडणार।
शेतकरी कामगार पक्ष भाई रामदास जराते यांचा इशारा
गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- फुटपाथ धारकांशी चर्चा करतांना पर्यायी व्यवस्था आणि गाडे वाटपा बाबत सकारात्मक आश्वासन दिले असतांना ते पुर्ण न करताच अतिक्रमण हटाव मोहीमेच्या नावाने सामान्य फुटपाथ धारकांना व्यवसायापासुन वंचित करण्याचे प्रयत्न राजकिय दळपणाखाली येवुन नगर परिषदेचे मुख्याधिकारी करीत आहेत.हा प्रकार तात्काळ थांबला नाही तर शेतकरी कामगार पक्षातफे मुख्याधिकार्यांना त्यांच्या कार्यालयातच कोंडणार असल्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिला आहे.
भाई रामदास जराते यांनी मटला आहे कि,मागील पंधरा दिवसांपूर्वी नगरपरिषद ,महामार्ग विभागानी पोलिस विभागाच्या मदतीने शहरातील पुटपाथ अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती.यामुळे हजारो कुंटुबाच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या नेतूत्वाखाली पुटपाथ धारकांचे आंदोलन उभे करण्यात आले होते.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष,वंचित आघाडी सह राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.दरम्यान मुख्यधिकारी विशाल वाघ यांनी आंदोलकांशी चचा करतांना शहरातील पक्क्या इमारतीचे अतिक्रमण सरसकटपणे हटवुन सविस रोड तयार करणे,585 पुटपाथ धारकांना तात्पुरती पर्यायी जागा आणि कारगील चौकातील गाळे देण्याबाबत अनुकुलता दशविली होती.लांझेडा लगतच्या तलाव परिसरात जागाही नियोजित केली गेली,माञ डुक्कर बसण्याच्या खड्डय़ामध्ये दुकाने लावणे शक्य नसल्याने फुटपाथ धारक सदर जागा व्यवस्थित होण्याची वाट बघत होते.असे असतांना शहरातील बड्या भांडवलदारांच्या आणी काही राजकीय लोकांच्या दडपणाखाली येवुन,दिलेले आश्वासन न पाळता पुन्हा पुटपाथ धारकांना हटविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाला व्यवसायापासुन वंचित करण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षातफे हाणुन पाडले जानार असुन वेळ प्रसंगी नगरपरिषदेच्या मुख्यधिकार्यांना त्यांच्या कार्यालयातच कोंडण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा भाई रामदास जराते यांनी दिला आहे.