राजेंद्र पाटील राऊत
मालेगांव महापालिकेचा महाप्रताप
एम.बी.शुगर दिली बेकायदेशीर पाईपलाईन;माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला भांडाफोड..!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव– नाशिक जिल्ह्यातील मालेगांव महानगरपालिका सतत या ना त्या कारणावरुन चर्चत येत असते.भ्रष्टाचाराच्या अनेक मुद्द्यावर या महानगरपालिकेची अब्रु पुरती वेशीवर टांगली गेली आहे.
अशातच आता मालेगांव महानगरपालिकेचा अजब गजब महाप्रताप चव्हाटयावर आला असून,गेल्या सन २०१९ पासून कुठलीही अधिकृत कागदपत्रे केलेली नसताना महापालिकेच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी काही पोटभरु नगरसेवकांना हाताशी धरुन निळगव्हाण शिवारात असलेल्या एम.बी.शुगर मिलला बेकायदेशीरपणे पाईपलाईन देऊन रोजचे लाखो लिटर पाणी गैरप्रकाराने या कंपनीला पुरविण्याचा धडाका लावला आहे.सामान्य जनतेच्या खिशाला झळ बसवून या कंपनीला हे बेकायदेशीररित्या पाणी देण्याचे महापाप भ्रष्ट कर्मचाऱ्यांसह तथाकथित नगरसेवकांनी केल्यामुळे आणि या गैरकृत्याचा भांडाफोड एका महिती अधिकार कार्यकर्त्याने केल्यामुळे आता सगळ्याचेच धाबे दणाणले आहे.
उद्या वाचा- कागदपत्रांची जमवाजमव करताना होत आहे कर्मचाऱ्यांची दमछाक!