Home पुणे शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

206
0

राजेंद्र पाटील राऊत

शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:- उमेश पाटील/युवा मराठा न्युज
पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शामभाऊ जगताप यांच्या हस्ते पत्रकारांना गौरविण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, सह्याद्री आदिवासी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी.बी. घोडे, जनार्दन इंगवले, संजय कांबळे, अक्षय जगताप, संदीप नलावडे, हिमांशू जगताप, भास्कर सदामते आदी उपस्थित होते.
शामभाऊ जगताप यांनी सांगितले, की पत्रकार हा समाजाभिमूख व समाजशील असतो. समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम पत्रकार तळमळीने करीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने उचित सन्मान होणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांपर्यंत विविध बाबींचा व शासनाने वेळोवेळी घालून दिलेले नियम पोहचवण्याचे काम पत्रकार उत्तमरित्या करीत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. भविष्यात पत्रकारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास आपण कटिबद्ध आहोत.

Previous articleआताची मोठ्ठी बातमी…!! उद्यापासून बदलणार नियम
Next articleपत्रकार दिनाचे औचित्य साधून कोविड लसीकरण जनजागृतीपर गिताचे विमोचन महत्त्वाचे संदेश मनोरंजक पद्धतीने देणे स्तुत्य- जिल्हाधिकारी निमा अरोरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here