राजेंद्र पाटील राऊत
अस्सायर मन्सुरा रुग्णालय म्हणजे
माणूसकीचे दर्शन घडविणारे ठिकाण
मालेगांव,(भाऊसाहेब भामरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– आजकाल रुग्णालये म्हटली की,सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडणारी ठिकाणे व आर्थिक लुट करणारी म्हणूनच ओळखली जातात.मात्र त्यास अपवाद म्हणून सुध्दा काही रुग्णालये आजही धर्मार्थ व सेवाभावी वृतीने कार्य करतांना दिसून येतात तेव्हा निश्चितच अजून माणूसकी जीवंत असल्याची प्रचिती येते.
त्याचे झाले असे की,”युवा मराठा न्युजचे” सटाणा तालुका प्रतिनिधी दावल पगारे यांचे वडील सिताराम सोनू पगारे यांना गत आठ दिवसापुर्वी पँरालिसीसचा झटका आल्याने,त्यांना मालेगांवजवळील चंदनपुरी रोडवर असलेल्या अस्सायर मन्सुरा रुग्णालयात सहा दिवस अगोदर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते,त्यावेळी डाँ.माजिद खातेवाला सेक्रेटरी मन्सुरा हाँस्पीटल यांची प्रत्यक्ष चंदनपुरीचे माजी सरपंच राजेंद्र पाटील,उपसरपंच मनोहर जोपळे,”युवा मराठा न्युजचे”मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी भेट घेऊन सिताराम सोनू पगारे यांच्या प्रकृतीची कल्पना दिली.त्यावर तात्काळ निर्णय घेत डाँ.माजिद यांनी सिताराम यांना अतिदक्षता विभागात दाखल केले.व गेल्या सहा दिवसापासून रुग्ण सिताराम पगारे यांचेवर सुरु असलेल्या उपचारामुळे रुग्ण सिताराम पगारे यांच्या प्रकृतीत बरेपैकी सुधारणा झाल्याने आज मन्सुरा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने रुग्ण सिताराम पगारे यांना डिचार्ज देतेवेळी दावल पगारे अत्यंत भावूक झाले व त्यांनी मन्सुरा रुग्णालयाचे डाँ,माजिद खातेवाला, डाँ शहेजाद अमीर,डाँ.मुब्बसीर,डाँ.फातेमा,डँ.अर्शद,डाँ.मुब्बसीर रहेमान व युवा मराठा परिवाराचे विशेष आभार व्यक्त करताना सांगितले की,गेल्या सहा दिवसात आपल्याला या रुग्णालयात सहदयपणे माणूसकीचे दर्शन घडले.अगदी साधारण शिपायापासून तर वरिष्ठ डाँक्टरांपर्यत सगळ्यांकडून मिळालेल्या वागणूकीमुळे माणूसकी अजून जीवंत असल्याचे दावल पगारे यांनी सांगितले.तर महागडया रुग्णालयामध्ये उपचार घेण्यापेक्षा गोरगरीबांसाठी मन्सुरा हाँस्पीटल हे एक मानवता केंद्रच असल्याचे पगारे यांनी सांगून,आपल्या वडीलांवर अल्पशा दरात चांगले उपचार व देखभाल करण्यात आल्याचे समाधान व्यक्त करताना दावल पगारे यांनी आज मन्सुरा रुग्णालयाचे सगळ्याच डाँक्टर व कर्मचाऱ्यांना पेढे वाटप करुन त्यांच्या कर्तबगारीस शुभेच्छा दिल्यात.