राजेंद्र पाटील राऊत
अधिकार्यांवर टीका करणे पत्रकारांचे परमकर्तव्य.
मानसिंग पाटील यांचे पत्रकाररत्न पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज)
राजकारणी आणि अधिकार्यांवर टीका करणे पत्रकारांचे परमकर्तव्य आहे. या टीकेतूनच समाजाला दिशा देण्याचे कार्य सुरू होते. आम्ही कुठेही कमी पडत असलो तर त्याची जाणीव पत्रकारांनी आपल्या लेखणीतून द्यावी. कमीपण वाटण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन पोलीस अधिकारी मानसिंग पाटील यांनी पालघरमध्ये केले. महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्यावतीने आर्यन सोसायटीच्या म. नि. दांडेकर सभागृहात आयोजित जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. टॉप टेन पालघर 2021 गुणवंतांची यशोगाथा महामॅगेझिनचेही प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर पत्रकार भाऊसाहेब गुंड, रायचंदभाई शहा, स्वामिनाथ पांडे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांव्यतिरिक्त समाजामध्ये भरीव कामगिरी करणार्या अतिथींचाही सन्मान यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक गुंड यांनी, तर सूत्रसंचालन राजू शर्मा यांनी केले.
यावेळी श्रवणसिंह राजपुरोहित, मुकेश दुबे, गिरजेश सिंह, शैलैश सिंह ठाकुर, रमेश चौहान, मधुकर पाटील, राधेश्याम चौधरी, अॅड. जयेश आव्हाड, अॅड. धरमसेन गायकवाड, छायेश झारापकर, सुरज मलहोत्रा, सुरज कैटर्स, निलेश पाटील, आर्किटेक्ट बिरूण जी, सौ. चंदा दीपक दुबे, पत्रकार ओमप्रकाश द्विवेदी, जावेद लुलानिया, स्नेहित पाटील, हर्षद पाटील, मंगेश तावडे, के. वी. नारायण, सुनील उघडे आदींचा सन्मान करण्यात आला.