राजेंद्र पाटील राऊत
सटाणा, – (शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
नवे निरपुर सरपंच मुन्ना सूर्यवंशी यांनी गावातीलअनाथ अपंगयुवक वृत्तपत्र विक्रेतास मोटर सायकल , (स्कुटी) चे डाऊन पेमेंट भरून अपंग व्यक्ती प्रती अनोखे दातृत्व दाखविले असून मुन्ना सूर्यवंशी यांच्या या दानशूरपणा चे सर्वत्र कौतुक होत आहे.
साधारणता मागील पाच वर्षांपूर्वी नवे निरपुर येथील सागर बाळासाहेब सूर्यवंशी हा युवक मालेगाव येथे त्याची पल्सर गाडी ने जात असताना सटाणा मालेगाव रस्त्यावरील ब्राह्मणगाव जवळ एक अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात सागर सूर्यवंशी गंभीर जखमी झाला होता त्यावेळी सरपंच नसलेले व सामाजिक कार्यकर्ते असलेले मुन्ना सूर्यवंशी व नवे निरपुरचे माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी तात्काळ याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन सागर यास स्वतः मुन्ना सूर्यवंशी व भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी मालेगाव येथील दवाखान्यात उपचारासाठी दखल केले.
त्या दिवशीच पोळा हा सण साजरा केला जात होता पण आपल्या गावातील तरुण युवकांचा अपघात झाल्यामुळे या दोघांनी तात्काळ जाऊन सागरला दवाखान्यात उपचारासाठी भरती केले परंतु हा अपघात इतका भीषण होता की सागर यास आपला उजवा पाय व उजवा हात गमावावा लागला.
सागरचे आईवडील दोघांचे निधन झाले असून सागर अनाथ आहे परंतु आपल्या उदरनिर्वाहासाठी तो पेपर वितरणाचे काम करतो . त्यासाठी त्याच्याकडे एक जुनी स्कुटी होती परंतु स्कुटी सतत खराब होत होती त्यामुळे त्याला रस्त्यात अनेक अडचणी येत होत्या. पेपर घेण्यासाठी सागरला दररोज सकाळी पहाटे साडेपाच वाजता सटाणा येथे जावे लागत असते परंतु गाडी नेहमी खराब झाल्यामुळे सागरला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. नेहमीप्रमाणे मुन्ना सूर्यवंशी सकाळी जॉगिंगला जात असताना रस्त्यावर खमताने च्या जवळ सागर ची स्कुटी बंद पडली होती व सागर खाली बसलेला होता त्यावेळेस मुन्ना सूर्यवंशी यांनी त्याची विचारणा केली असता माझी स्कुटी खराब झाली ती जुनी असून नेहमी खराब होत असते त्यामुळे आता मला कोणाच्यातरी गाडीत टाकून सटाणा येथे गॅरेज वर घेऊन जावे लागेल. असे मुन्ना सूर्यवंशी यांना सांगितल्यामुळे मुन्ना सूर्यवंशी यांनी सागर याला नवी गाडी का घेत नाही असे विचारले असता माझ्याकडे नवीन गाडी घेण्यासाठी डाऊन पेमेंट भरण्यासाठी पैसे नाही त्यामुळे मी नवी गाडी घेऊ शकत नाही .ही गोष्ट मुन्ना सूर्यवंशी यांनी यांच्या पत्नी सटाणा बाजार समितीच्या संचालिका रत्नमाला सूर्यवंशी यांच्यासोबत चर्चा करून आपण सागरला स्कुटी घेण्यासाठी मदत करूया असे सांगितले व त्याप्रमाने त्यांच्या पत्नीने ही होकार दिला . त्याप्रमाणे गाडीचे डाऊन पेमेंट भरुन गाडीची चावी सागरला सुपूर्द केली. गाडीची चावी सागरला सुपूर्द केल्याने सागरच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते .अशा या अनोख्या
दातृत्वाची सर्वत्र चर्चा होत असून मुन्ना सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी रत्नमाला सूर्यवंशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
” लोक दगडात ,मूर्तीत व फोटोमध्ये देव शोधतात परंतु मी मुन्ना दादा सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी रत्नमाला सूर्यवंशी काकू या दोन माणसानं मध्ये देव पाहिला “
सागर सुर्यवंशी- अपंग पेपर विक्रेता