राजेंद्र पाटील राऊत
घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती द्या ; अन्यथा रस्त्यावर उतरू
▶️लाभार्थ्यांचे तहसिलदारांना निवेदन
•••••••••••••••••••••••••••••••••••••
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड नगर परिषद मार्फत अनेक गोर गरीब लाभार्थ्यांना घरकुले मंजुर झाली आहेत. घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्राास रेती देण्याचे प्रशासनाचा आदेश असतानाही शासन स्तरावर याची कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती दयावी अन्यथा रस्त्यावर उतरू व अवैध रेतीच्या गाडया जाऊ देणार नाही असा इशारा लाभार्थ्यांनी तहसिलदार यांना एका निवेदनाव्दारे दि. १५ रोजी दिला आहे.
याबाबत वारंवार लेखी व तोंडी नागरीकांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले पण लाभाथ्र्यांविषयी कोणतीच पाऊले उचलली गेली नाही. सध्या शहरात अनेक गोर गरीबांनी आपल्या स्वप्नातील घर बांधकाम करण्यासाठी घरे पाडली आहेत. घर बांधकाम करण्यासाठी लागणारी रेती मात्र लाभार्थ्यांना कुठेच मिळत नाही आणि कुठे मिळाली तर अव्वाच्या सव्वा दराने विक्री करीत करुन लाभार्थ्यांची लुट करीत आहेत.
घरकुल लाभार्थ्यांची होणाऱ्या लुटीकडे प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत नाही तरी घरकुल लाभार्थ्यांना पाच दिवसात रेती देण्याची व्यवस्था करावी अन्यथा सर्व लाभार्थ्यांना घेऊन शहरातून अवैध रेती वाहतुक करणाऱ्या गाडया अडवून प्रशासनाच्या स्वाधीन करू यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संपुर्णपणे स्थानिक प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ज्ञानेश्वर डोईजड, बालाजी वाडेकर, रणजित जामखेडकर,खाजा धुंदी,पवन जगडमवार आदी उपस्थित होते.