राजेंद्र पाटील राऊत
राजुरा बु.)ता. मुखेड येथील खंडोबा यात्रेनिमित्त होणारा कुस्त्याचा जंगी फड कोरोना (covid19 मुळे रद्द..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड मुखेड तालुक्यातील मौजे राजुरा ( बु.) ता. मुखेड जिल्हा नांदेड येथे खंडोबा यात्रेनिमित्त दरवर्षी दत्त जयंती पौर्णिमेदिवशी जंगी कुस्त्या चे आयोजन करण्यात येत होते . पण यावर्षी मात्र कोरोना( covid19) संकट काळाची परिस्थिती लक्षात घेता अनेक वर्षापासून चालत आलेल्या खंडोबा यात्रेनिमित्त च्या कुस्त्याचा फड यात्रा समिती व गावकऱ्यांची बैठक घेऊन या कुस्त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजुरा बु. येथील खंडोबा यात्रेच्या या जंगी कुस्त्यांच्या फडास दूर दूरवरून पैलवान येत होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कुस्त्यांचा फड रद्द करण्यात आल्याची सूचना यात्रा प्रेमी व पहिलवान यांनी घ्यावी. असे राजुरा बु. येथील यात्रा समिती व गावकऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.