Home नांदेड नांदेड जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली..

नांदेड जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली..

85
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला असून जिल्ह्यात थंडी वाढली असून थंडीमुळे पहाटेच्या वेळी धुक्याची चादर सर्वत्र पसरत असून जागोजागी शेकोट्या पहावयास मिळत आहेत. दरम्यान रब्बीसाठी पोषक असे वातावरण तयार झाले असून गहू हरभरा ज्वारी सह पिके डोलू लागले आहेत जिल्ह्यात व शेजारी जिल्ह्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे राज्याच्या वातावरणात सध्या चढ-उतार दिसून येत आहे यंदा मात्र गुलाबी थंडीचे आगमन ऑक्टोबर महिन्यातच झाले होते मात्र त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी गायब होती. वातावरणातील बदलामुळे सातत्याने निर्माण होणारा चक्रीवादळ अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र आता वातावरण पूर्णपणे कोरडे झाले आहे यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाली आहे त्यामुळे चार दिवसात तापमानात मोठी घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here