राजेंद्र पाटील राऊत
उदगीर देगलूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुक्रमाबाद – येथून जवळच असलेल्या हळणी परिसरात रस्ता तयार झाला पण या रोडवरील साईड पट्ट्या न भरल्यामुळे मालवाहतूक करणारा ट्रक लुटण्याच्या घटना घडत आहेत. व अपघाताच्या घटना घडत आहेत तर ही घटना हाळणी गावापासून अर्धा किमी अंतरावर घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी मात्र घडली नाही. देगलूर मुक्रमाबाद ते उदगीर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने रावणकोळा ते रावी रस्ता नुकताच नव्याने करण्यात आला आहे. पण या रस्त्यालगत असलेल्या साईड पट्ट्या न भरल्याने उदगीर कडून देगलूर कडे जाणारा मालवाहू ट्रक शनिवारी उलटला. सदर रस्ता नव्याने तयार करण्यात आल्याने रस्त्याची उंची वाढली आहे. रस्ता अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देणे अवघड होऊन बसले आहे. अशाच साईड देण्याच्या प्रकारामुळे हळणी पासून ते मुक्रमाबाद अर्धा किमी अंतरावर ट्रक उलटला. सुदैवाने यामध्ये मात्र कोणतीही जीवित हानी घडली नाही . प्रशासनाने साईड पट्ट्या त्वरित भरून घ्यावे असे आवाहन अशी मागणी प्रवासी वाहतूकदार चालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.