आशाताई बच्छाव
मोठी बातमी ! लोणारच्या ५ जणांचे मोठे कांड; “काळ्या जादुसाठी”पांढऱ्या कारमध्ये घेऊन गेले १० लाख रुपयांचा “हा” साप! छत्रपती संभाजीनगरात गेल्यावर….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मेहकर
काळ्या जादूसाठी मांडुळ नावाच्या सापाची तस्करी करणाऱ्या ५ जणांचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पाचही आरोपी लोणारचे आहेत.. लोणारवरून मांडूळ जातीचा ४ किलो वजनाचा साप घेऊन पाचही जण कारने छत्रपती संभाजी नगर कडे निघाले होते. चिकलठाणा विमानतळा समोर पोलिसांनी कारला अडवल्यानंतर हा काळ्या जादूसाठी मांडुळ नावाच्या सापाची तस्करी करणाऱ्या ५ जणांचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पाचही आरोपी लोणारचे आहेत.. लोणारवरून मांडूळ जातीचा ४ किलो वजनाचा साप घेऊन पाचही जण कारने छत्रपती संभाजी नगर कडे निघाले होते. चिखलठाणा विमानतळा समोर पोलिसांनी काढला अडवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला रामभाऊ नारायण अंभोरे (४२), संतोष बाबुराव कोकाटे (२१), राजू विठ्ठल इंगोले (४०) रवींद्र बाबाराव कलसारे (२६) कन्हैयालाल बद्रीलाल जानवा (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आरोपी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये मांडुळ जातीचा साप घेऊन छत्रपती संभाजीनगर कडे जात होते. गोपनीय सूत्रांनी तशी माहिती दिल्यानंतर पोलिस पुढील तपास करीत आहे