Home बुलढाणा बापरे बाप केवढा मोठा साप ! ‘विद्यार्थी पायरी चढत होते अन् पायरीवर...

बापरे बाप केवढा मोठा साप ! ‘विद्यार्थी पायरी चढत होते अन् पायरीवर फुत्कारला कोब्रा

41
0

आशाताई बच्छाव

1001335765.jpg

बापरे बाप केवढा मोठा साप ! ‘विद्यार्थी पायरी चढत होते अन् पायरीवर फुत्कारला कोब्रा !’
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा साप म्हणजे साक्षात जमिनीवर सरपटणारा मृत्यूच! तो दिसला की, भल्या भल्यांची भांबेरी उडते. असाच भला मोठा कोब्रा विद्यार्थ्यांना शाळेच्या पायरीवर दिसल्याने भादोला रोडवरील सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूलमध्ये भितीयुक्त वातावरण तयार झाले होते. परंतु सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी तात्काळ शाळेत पोहोचून कोब्रा जातीच्या सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

सेंट जोसेफ इंग्लीश हायस्कुल, भादोला रोड बुलडाणा येथे 17 मार्च रोजी अती निघाला विषारी साप आढळला मात्र मोठा अनर्थ टळला. सकाळी 8 वाजता शालेय इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पायऱ्यांवर शाळेतील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना कोब्रा साप दिसून आला. कोब्रा साप विषारी असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना पाचरण करण्यात आले होते. त्यांनी लगेच विषारी सापाला पकडले आणि बरणीबंद करून जंगलात सोडून दिले. यावेळी शाळेच्या प्राचार्या सिस्टर अमुथा पी. प्रदीप देशमुख, देवानंद जाधव, ज्ञानेश्वर कुटे, फव्वाद अहमद, पुनम पालकर, पुनम मावळे, शुभांगी कांबळे कैलास डुडवा, मो. शफीक, भरत घोडके, रंजना आडवे उपस्थित होत्या. यावेळी सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी कोब्रा या विषारी सापाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन जनजागृती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here