आशाताई बच्छाव
BIG NEWS! ‘ब्लेड प्रकरणात’ जबरदस्तीने सह्या – मुख्याध्यापिकेचा खोट्या पुराव्यांचा डाव ? ‘युवा मराठा ‘चा मोठा खुलासा – शाळेत होणाऱ्या जुलुमांची सत्यकथा उघड !
बुलडाणा :- भादोला जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. ‘युवा मराठा ‘ने काही
दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी हातावर ब्लेड मारून घेतल्याची धक्कादायक बाब उघड केली होती. यानंतर आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. या शाळेतील ८ शिक्षकांनी एका अर्जाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली आहे. मुख्याध्यापिका जाधव यांनी शिक्षकांवर मानसिक छळ करून त्यांना गुलामासारखी वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
शाळेतील शिक्षकांचा थेट आरोपः शिक्षकांना वर्ग झाडण्याची नोटीस विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांना कचरा उचलायला लावणे.
मोबाईल जप्तीचा नियम फक्त शिक्षकांसाठी
मुख्याध्यापिका आणि त्यांची बहिण मात्र मुक्तपणे मोबाईल वापरतात.- बंधुत्वाच्या जोरावर मनमानी
मुख्याध्यापिकेच्या बहिणीला शाळेत सामावून घेण्यासाठी शिक्षकांवर दबाव.
बळजबरीने मागील तारखेला सह्या करण्याचा दबाव – ‘ब्लेड प्रकरणात’ जबरदस्तीने शिक्षकांची नावे अडकवण्याचा कट.
महिला शिक्षकांचा अपमान- ‘तुझी कंबर मोडलेली आहे, तरी काय खेळतेस?’ अशा अश्लील टिपण्या.
अपंग शिक्षिकेची अवहेलना – ‘ही लंगडी आम्हाला नको’ असे हिनवणारे वक्तव्य.
रजेवर दुहेरी नियम शिक्षकांवर अन्याय !
मुख्याध्यापिका स्वतःच्या बहिणीच्या ९० ते १०० दिवसांच्या रजांना सहज मंजुरी देतात, मात्र इतर शिक्षकांना किरकोळ रजेसाठीसुद्धा ताटकळत
ठेवतात. एका शिक्षकाने रजेचा अर्ज दिल्यानंतरही त्यावर “अनधिकृत गैरहजर” असा शेरा मारण्यात आला.
मुख्याध्यापिकेच्या दहशतीमुळे शिक्षकांची सामूहिक बदलीची मागणी!
शाळेतील वातावरण इतके बिघडले आहे की, शिक्षकांनी सामूहिक बदलीसाठी अर्ज केला आहे. व्यवस्थापन समितीच्या मदतीने मुख्याध्यापिका सर्व शिक्षकांना त्रास देत असून, कोणत्याही क्षणी मोठा वाद होऊ शकतो.
शिक्षण विभाग गप्प का?
विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांवरच अन्याय होत असेल, तर भविष्यात शाळांचे काय होणार? गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या बहिणीच्या मनमानीवर शिक्षण विभाग कधी धडा शिकवणार? शिक्षणाच्या मंदिरात हा खेळ किती दिवस चालणार?
‘युवा मराठा या प्रकरणावर लक्ष ठेवून असून, लवकरच आणखी धक्कादायक बाबी उघड केल्या जातील!