आशाताई बच्छाव
गणेश मंगल कार्यालयात 7 मार्चला पवनी तालुक्याच्या वतीने नाभिक समाज मेळावा ,उपवर वधू वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी , व जेष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र महामंडळ मुंबई जिल्हा शाखा भंडारा तालुका शाखा पवनी च्या वतीने 7 मार्चला सकाळी 10 वाजता रोज शुक्रवारला भव्य तालुकास्तरीय नाभिक समाज मेळावा ,उपवर वधू वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्काराचे आयोजन गणेश मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेले आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन राजेंद्रजी इंगळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नाभिक महामंडळ करणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.अशोकराव सालोटकर पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष नाभिक महामंडळ हे राहणार आहेत .प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र फुलबांधे कार्याध्यक्ष नागपूर जिल्हा, मधुकर फुलबांधे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष, प्रमोद मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष, रोशन उरकुडे ज्येष्ठ नागरिक, जगदीश सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष, अशोकराव फुलबांधे जिल्हा कार्याध्यक्ष ,नीताराम पवनकर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख ,घनश्याम बनकर, डेव्हिड मेश्राम ,शरदभाऊ उरकुडे पूर्व विदर्भ अध्यक्ष, श्रीमती मायाताई लांजेवार ,जिल्हाध्यक्ष विठोबाजी मेश्राम जिल्हा सचिव, विजय भाऊघुमे माजी तालुका अध्यक्ष ,हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे ,पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य पूजाताई हजारे पिंपळगाव क्षेत्र, विवेक येवतकर वनपरिक्षेत्र अड्याळ ,प्रमोद भाऊ मेंढे उपसभापती पंचायत समिती पवनी,सुवर्णाताई मुंगाटे जि प सदस्य भंडारा ,सीमाताई गिरी पंचायत समिती पवनी, प्रदीप चन्ने, प्राध्यापक राजेश नंदपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी लाखांदूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन तूशांत नैनपूरकर सहसंघटक पवनी, किशोर भाऊ कावळे कोषाध्यक्ष शाखा अड्याळ,विष्णु उरकुडे देखरेख प्रमुख, किशोर क्षीरसागर सचिव ,अक्षय शेंडे कोषाध्यक्ष मेळावा समिती, राजूभाऊ फुलबांधे देखरेख प्रमुख ,रितेश कावळे सहसचिव ,योगेश क्षीरसागर देखरेख प्रमुख ,तारेश मौदेकर अध्यक्ष पवनी तालुका ,संजयभाऊ फुलबांधे उपाध्यक्ष पवनी तालुका ,पराग दहिकर सचिव पवनी तालुका यांनी केलेले आहे.