आशाताई बच्छाव
ॲड. महेंद्र गोस्वामी यांची नोटरी म्हणून नियुक्ती
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी): मुळचे पवनी येथील रहिवासी असलेले भंडारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जेष्ठ विधीज्ञ ॲड. महेंद्र गोस्वामी यांची भारत सरकारने भंडारा जिल्ह्यासाठी नोटरी म्हणून नियुक्ती केली आहे.
ॲड. महेंद्र गोस्वामी यांचा विविध सामाजिक व धार्मिक संस्थेशी संबंध असून विविध बॅंका, शैक्षणिक व वित्तीय संस्थेच्या पॅनलवर ते काम करीत आहेत.
त्यामुळे दिवसेंदिवस वाढत जाणारे आर्थिक व खरेदी विक्रीचे व्यवहाराचे करारनामे, मृत्यूपत्र, विविध शपथपत्र, शैक्षणिक व नोकरीच्या निमित्ताने आवश्यक प्रतिज्ञालेख अशा सर्व कामांकरिता त्यांची निश्चितच मदत होणार आहे.
ॲड. महेंद्र गोस्वामी यांच्या नियुक्ती बद्दल विविध सामाजिक व वित्तीय संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.