Home बुलढाणा EXCLUSIVE! पंजाबच्या गव्हामुळे बुलडाण्यात गंजपणाचा कहर ? – पद्मश्री डॉक्टरचा धक्कादायक दावा!

EXCLUSIVE! पंजाबच्या गव्हामुळे बुलडाण्यात गंजपणाचा कहर ? – पद्मश्री डॉक्टरचा धक्कादायक दावा!

51
0

आशाताई बच्छाव

1001274319.jpg

EXCLUSIVE! पंजाबच्या गव्हामुळे बुलडाण्यात गंजपणाचा कहर ? – पद्मश्री डॉक्टरचा धक्कादायक दावा!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये अचानक लोकांचे केस गळण्याच्या प्रकारांनी खळबळ उडवली आहे. तब्बल 15
गावांमधील 300 हून अधिक लोक गंजले असून, यामागे पंजाबहून आलेल्या गव्हाचा संबंध असल्याचा दावा पद्मश्री पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध फिजिशियन डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केला आहे. डॉ. बावस्कर यांनी महिनाभर संशोधन करून धक्कादायक निष्कर्ष मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत मिळणाऱ्या गव्हात सेलेनियम या घटकाची मात्रा अत्यधिक प्रमाणात आढळून आली आहे, तर जस्त (झिंक) कमतरतेत आढळले आहे.
ही समस्या उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. याशिवाय, ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) च्या शास्त्रज्ञांनीही पाणी व मातीचे नमुने गोळा करून तपासणी केली. तपासणीतही या भागातील प्रभावित लोकांच्या रक्तात सेलेनियमची पातळी जास्त असल्याची पुष्टी झाली आहे.डॉ. बावस्कर यांनी भोनगावातील सरपंचाच्या घरातील गहू तपासला असता, त्यात मेटॅलॉईड धातूंची उपस्थिती आढळली.
शरीरासाठी सेलेनियम आवश्यक असले तरी त्याचे अति प्रमाण धोकादायक ठरू शकते. ICMR ने केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला आहे, मात्र तपशील अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून, गव्हाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here