आशाताई बच्छाव
सदर बाजार डिबी पथका ची कार्यवाही एका तरुणांकडून धारदार तलवार तसेच एकांकडून एक धारदार खंजीर जप्त.
जाफराबाद जालना प्रतिनीधी- मुरलीधर डहाके
दिनांक 25 2 2025 रोजी पोलीस ठाणे सदर बाजार डीबी चे पोलीस अमलदार पोहेकाँ.जाधव पोस्ट ला हजर असताना त्यांना गोपनीय माहितीदार मार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की कुलजितसिंग काजल सिंग टाक वय 20 वर्ष राहणार हनुमान नगर जालना हा सेंट मेरी शाळेजवळ तलवार घेऊन फिरत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती यांना देऊन त्यांचे आदेश तसेच मार्गदर्शनाखाली दोन पंच व नमूद पोलीस स्टॉप सह सेंट मेरी शाळेजवळील नाराज जवळ त्यास 16.30 वाजता ताब्यात घेतले त्यांचे ताब्यातून धारदार तलवार जप्त केली आहे.
तसेच दुसऱ्या घटनेत किसान नामे करण प्रदीप साळवे वय 19 वर्षे राहणार हनुमान नगर जालना हा नवीन मुंडा जवळील हॉटेल देवांश जवळ त्याचे कमरेला खंजीर लावून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास 17.30 वाजता दोन पंचा समक्ष ताब्यात घेऊन त्याचे कडून एक धारदार खंजीर डिबी पथकाने जप्त केला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मा.श्री.अजय कुमार बंसल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती साहेब यांचे नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, पोहेकॉ 1267 जगन्नाथ जाधव, पोकॉ /593 रंगे,पोकॉ/ 963 दुर्गेश गोफने ,पोकॉ/ 230 शेख व पोकॉ/842 विलास पवार यांनी केली