आशाताई बच्छाव
ब्रेकिंग ! बुलढाणा जिल्ह्यात आढळला GBS चा पहिला रुग्ण ? लाखात एक रुग्ण आढळतो !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलडाणा दूर्मिळ आजार म्हणजे GBS ! आणि या आजाराचा रुग्ण आढळला जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथे ! रुग्ण केवळ साडे आठ वर्षाचा बालक आहे. त्याला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
GBS म्हणजे गुईलेन बॅरे सिंड्रोमने राज्यभर हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेत.. आता बुलढाणा जिल्ह्यातील एक रुग्ण आढळला. परंतू लाखात एक रुग्ण आढळतोच ! त्यामुळे भिती वाटण्याचे कारण नाही. GBS हा रोग कुठल्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही. काही विषाणू अन्नपदार्थांतून आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहर याच कारणामुळे GBS आजार होतो हे निष्पन्न झाल्याचे तज्ञ सांगतात.
आजाराची सर्वसाधारण लक्षणे
अचानक पायात किंवा हातात अशक्तपणा किंवा
लकवा येणं. अचानकपणे चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा जाणवणे. डायरिया जास्त दिवसांचा नागरिकांनी काय काळजी घ्यावी? पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी उकळून घेणे. अन्न स्वच्छ आणि ताजे असावे. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित ठेवणं टाळावे. नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. लक्षणे आढळल्यास जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, चव्हाण करण्यात आले आहे.