आशाताई बच्छाव
सुख हे कायमस्वरुपी असायला हवे-हभप डॉ. भगवान बाबा आनंदगडकर
सकाळीच कॉलनीतून निघालेल्या दिंडीने लोकांना आकर्षित केले तर काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: आज प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे पण सुख कोठे आहे? सुख हे आपल्याला कायमस्वरुपी असावे, असे वाटत असेल तर परमार्थाकडे वळावे लागेल, असा हितोपदेश हभप डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांनी येथे बोलतांना दिला.
हभप डॉ. आनंदगडकर हे सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात आयोजित केलेल्या काल्याच्या किर्तनात बोलत होते. आपल्या कीर्तनाच्या प्रारंभीच त्यांनी गजनान महाराज संस्थानचे अध्यक्ष स्व. शिवाजीराव आर्दड यांना श्रध्दाजली अर्पण करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पुढे बोलतांना हभप डॉ. आनंदगडकर म्हणाले की, सुखासाठी आज रोजी प्रत्येक जण झटतांना दिसतो आहे पण सुख कोठे आहे? भरपूर पैसा, गाडी, बंगला असला म्हणजे सुख आहे असे थोडेच आहे. आपल्याला कायमस्वरुपी सुख असावे असे वाटत असेल तर परर्थाकडे वळावे लागेल, असेही ते म्हणाले. लग्नच नसेल तर काय करायचे त्या पैशाचे, गाडीचे आणि बंगल्याचे? लग्न झाले तरी मुलांसाठी जिव झुरतोच ना, असे सांगून हभप डॉ. आनंदगडकर यांनी श्रीकृष्ण लिलांबरोबरच कंस आणि भारतीय संस्कृतीचे महत्वही विषद केले. तत्पूर्वी सकाळीच सहकार बँक कॉलनी आणि परिसरातून निघालेल्या दिंडीने लोकांचे आकर्षित करुन घेतले. लक्ष्म्यांनी आपल्या घरापुढे सडा, रांगोळ्या काढल्या होत्या. त्यामुळे दिंडीत सहभागी झालेल्या वारकर्यांनाही थोडावेळ का होईना हायसे वाटले. गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या सप्ताहाची सांगता आज शुक्रवारी हभप डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. त्यानंतर उपस्थित सर्वाना महाप्रसाद देण्यात आला.