आशाताई बच्छाव
पत्रकार व वृत्तपत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – माजी आ. गोरंट्याल
पीसीएम जालनाच्यावतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
जालना । प्रतिनिधी दिलीप बोंडे- राज्यभरातील पत्रकार व वृत्तपत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी येथे दिले. गुरुवार (दि. 20) रोजी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र (पीसीएम) जालना जिल्ह्याच्यावतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आ. गोरंट्याल बोलत होते. यावेळी पीसीएमचे राज्य सरचिटणीस महेश जोशी, संस्थापक सरचिटणीस विजयकुमार सकलेचा, जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माजी आ. गोरंट्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आचार्य जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.पुढे बोलतांना माजी आ. गोरंट्याल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा पुतळा बसविण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करून त्याच बरोबरच राज्यातील पत्रकार आणि वृत्तपत्रांच्या ज्या काही मागण्या आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही गोरंट्याल म्हणाले.
प्रास्तविक करतांना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले. तसेच आचार्य जांभेकर यांचे पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य आहे. दर्पण आणि मासिक दिग्दर्शन या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात योगदान दिले. तर अनिष्ठ रुढी पंरपरा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला.