आशाताई बच्छाव
कर्माचे भोग हे भोगावेच लागतात-राहुल महाराज जोशी
हभप त्रिंबक महाराज दस्तापुरकर यांचे आज हरिकिर्तन
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे
कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. ते कोणालाही सुटलेले नाही. मग कर्म करणार्याला वाटत असेल की, माझ्याकडे कोणीही पाहत नाही. परंतू हे चुकीचे आहे. असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला. दरम्यान, आज रात्री हभप त्रिंबक महाराज दस्तापूरकर यांचे हरिकिर्तन होणार आहे.
श्री. जोशी महाराज सहकार बँक कॉलनीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या भागवत कथेचे सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शेवटी कंसाचे खुप हाल झाले. त्याला मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द भगवान परत्मा कृष्ण होते. कंसाच्या दशा आपण पाहिली आहे, ऐकली आहे. म्हणूनच भक्ती करावी तर भगवान परत्मा श्री कृष्णाची करावी, यावेळी जोशी महाराजांनी गायिलेल्या भजनाला श्रोत्यांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. छोटी छोटी गया छोटे- छोटे गॉल याच बरोबर त्यांनी यावेळी अनेक भजनं गायिली.
कीर्तन सेवेत आज हभप श्री रसाळ महाराजांनी यांनी जग्तगुरु संत तुकाराम महाराजांच्या अंभगावर निरुपन केले. ते म्हणले की, आज काल सुख कोठे आहे, तर ते फक्त भगवंतांच्या भक्तीमध्ये आहे. म्हणूनच भगवंत भक्तीचा विसर पडू देऊ नका, असेही रसाळ महाराज म्हणाले.
यावेळी विश्वस्त मंडळचे सचिव श्री संपतराव पाटील, मंडळाचे अन्य पदाधिकारी व कॉलनी भाविकांसह हभप शिरीष सांगोळे, तुकामरा मुंडे, आत्माराम बिडवे आदींची उपस्थिती होती.