आशाताई बच्छाव
सरस्वती माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 19/02/2025
याविषयी सविस्तर माहिती अशी की, सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १९ फेब्रुवारी रोजी गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक तसेच अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मा. सचिन देशमुख सर यांच्या हस्ते स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यालयाच्या उपस्थित कर्मचाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज की, जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मा. सचिन देशमुख सर, श्री डी. एम. बोरुळ ,श्री व्ही. एस. दळवी, श्री के, व्ही. नवल, श्री आर, आर, वायाळ, श्री एस, ए, आमले, श्री रोहित बेंबडे, श्री एस. डी.दांडगे, श्री व्ही.पी. देशमुख, श्री एन. बी. कणखर, श्री एस. ए. दांडगे, श्री एस. एम. शेळके, श्री डी. ए. वाघ ,श्री व्ही. टी. बोर्डे ,श्री आर .ए. साबळे, श्री ए. एम. कोहिरे, श्री एस. पी. शिंदे ,श्री जी. एन. डोंगरे, श्री पी. जी. पाटील, श्री नरेंद्र शिंदे,श्री कळम श्री लोखंडे , श्री शिवाजी मुळे,श्री बी.एफ. वाघ, श्री एल. जी. वाघ, श्री भरत गळगुंडे आदी कर्मचारी उपस्थित होते.