आशाताई बच्छाव
प्रत्येक समाजाच्या धर्माचा सर्वानी आदर केलं पाहिजे,त्यामुळे सर्व
समाजामध्ये एकता,बंधुता,प्रेम निर्माण होईल- ह.भ.प. सोपानदादा कानेरकर :
शिवजयंतीनिमित्त ५ हजार शिवभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
बदनापूर, दि. १८(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-प्रत्येक समाजाच्या धर्माचा सर्वानी आदर केलं
पाहिजे,त्यामुळे सर्व समाजामध्ये एकता,बंधुता ,प्रेम निर्माण होईल त्याच
प्रमाणे आजची पिढी मोबाईलमुळे ध्येयपासून दूर जात असून मोबाईलसारख्या
वस्तूंचा वापर कमी करून आपल्या पूर्वज महापुरुषांचा आदर डोळ्यासमोर ठेऊन
कार्य करावे व एकमेकांचा आदर करावा, असे आव्हान ह.भ.प. सोपानदादा कानेरकर
यांनी शिवजयंती निमित्त पाथ्रीकर कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात केले.
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या सचिव डॉ. एम.डी.पाथ्रीकर यांनी
शिवजयंती निमित्त बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ५ हजार लोकांसाठी
महाप्रसादाचा कार्यक्रम १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केला होता व त्या
निमित्ताने ह.भ.प.सोपानदादा कानेरकर यांचे व्यख्यान आयोजित करण्यात आले
होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे अध्यक्ष डॉ.देवेश पाथ्रीकर
यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी संस्थेचे संचालक
डॉ.एस.एस.शेख,डॉ.खान नाजमा आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना ह.भ.प.
कानेरकर म्हणाले की,मुलींनी पोशाख हा पूर्णपणे घ्यावा,जेणेकरून अत्याचार
सारख्या घटना घडणार नाही. त्याच प्रमाणे युवकांनी आपल्या थोर पुरुषांचे
आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वागल्यास गुन्हेगारी कमी होईल, आजची तरुण पिढी
डिजिलयशनमुळे ध्येयापासून दूर जात आहे. त्यांना कोणतेच भान राहिलेले
नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे,छत्रपती
शिवाजी महाराज हे केवळ एका धर्माचे नेतृत्व करीत नव्हते. तर त्यांना
प्रत्येक धर्मात आदराने बघितले जात होते.