आशाताई बच्छाव
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला मिळाले -राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे
भंडारा -शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध,श्रामनेर बुद्ध पाल, यावेळेस प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले .यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वप्रथम रायगडावर कोणी शोधून काढली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि त्यांनीच रायगडावर प्रथम शिवजयंती साजरी केली .त्यामुळे त्याचे संपूर्ण श्रेय सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांना जाते. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करायचा होता त्यावेळेस पुण्यातील
पेशवाईंनी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. त्यामुळे काशीवरून गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणाला बोलावून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला. परंतु गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणाने डाव्या पायाच्या अंगठ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लक्षात आले की, आपण शूद्र आहोत नाहीतर ते सुद्धा स्वतः उच्चवर्णीय समजत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जातीयता पाळल्या जात नव्हती .सर्व धर्माच्या लोकांना समान न्याय दिला जात होता. महिलांना समान सन्मान दिल्या जात होता. लष्करात सर्व जातीच्या लोकांना समाविष्ट केल्या जात असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रमोद वासनिक अंबादास मेश्राम यांनी सहकार्य केले.