Home संपादकीय आदर्शवादी राजा,छत्रपती शिवराय माझा

आदर्शवादी राजा,छत्रपती शिवराय माझा

39
0

आशाताई बच्छाव

1001251195.jpg

आदर्शवादी राजा,छत्रपती शिवराय माझा
( जयंतीदिनानिमित विनम्र मानाचा मुजरा)
लेखन-राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक युवा मराठा न्युज महाराष्ट्र
आज महाराष्ट्रचं नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती!हा लेख लिहतांना मला आज माझ्या राजांची आदर्श विचारसरणी या लेखाव्दारे मांडायची आहे,छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त कुणा एका जाती धर्मापुरते मर्यादीत नव्हते.तर महाराज अखंड हिंदुस्थानाच्या पाठीवरील अठरा पगड जाती व बारा बलुतेदाराचे खरे रक्षणकर्त व स्वराज्य संस्थापक होते.महाराजांच्या सैन्यातील मावळ्यात सगळ्याच जाती पंथाचे लोक एकत्रितपणे निष्ठावान मावळ्यांची भुमिका निभावत होते.असे असताना राजकारण्यांनी मात्र छत्रपती शिवरायांना एका विशिष्ट जाती धर्मात अडकवून ठेवले हि शोकांतिका आहे.महापुरुष हे कधीही एका विशिष्ट जातीधर्मासाठी लढले नाहीत.तर त्यांनी समाजोकल्याणासाठी आपले अविरत योगदान देऊन त्याग केला.साधे शिवचरीत्र वाचले तरी आपल्या अंगावर काटे येतील.एवढा आदर्श माझ्या छत्रपतीनी निर्माण करुन ठेवला “परस्त्रीला देखील मातेची उपमा देऊन साडीचोळी भेट करुन तिचा मानसन्मान राखला”त्या आदर्शावर आज आम्ही किती जण वाटचाल करीत आहोत हा अभ्यासण्यासारखा प्रश्न आहे.महाराजांची आदर्शवादी शिकवण म्हणजे माणस जोडा आणि याच जोडलेल्या माणसाच्या सहाय्याने इतिहास घडविता येईल.येथे मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की,आम्ही एकमेकांचे पाय धरुन मागे ओढण्यातच आघाडीवर आहोत.दिलेल्या शब्दाला जागा हि महाराजांची शिकवण…महाराजांच्या काळात रयतेचे गवताच्या काडीलाही कुणी हात लावणार नाही एवढा दरारा माझ्या राज्यांचा होता,येथे मात्र आम्ही आमच्या शेजारच्या शेतकऱ्याचे शेतीचे बांध कोरण्यातच स्वतः ला धन्य समजत आहोत.मग काय अधिकार आहे आम्हांला छत्रपतीचे नाव मतलबापुरते वापरण्याची? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीची काळात कुणा परस्त्रीकडे वाकडया नजरेने पाहणाऱ्यांची खैरच केली जात नव्हती.रांझ्याच्या पाटलांचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा केल्याचा इतिहास छत्रपतीचा आहे.मात्र आजकालची दाढी वाढवून कानात बाळी घालून तोंडात गुटख्याची पुडी टाकून छत्रपतीची नक्कल करीत रस्त्यावरून जाणाऱ्या लेकीबाळीला ज्या वेळेस बाईकचा कट मारुन छेड काढतात त्यावेळी निश्चितपणे वाटते आज माझे राजेच पाहिजे होते या अशा बिघडलेल्या औलादींचा चौरंगा करायला! छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्शवादी राजे म्हणून संपूर्ण हिंदुस्थानाच्या पाठीवर कार्यकर्तव्यतत्पर ठरतात.आऊसाहेब जिजाऊच्या विचारांची महाराजांवर जबरदस्त छाप होती.महाराज कधीच आपल्या आऊसाहेबांच्या शब्दापलिकडे जात नव्हते.जिजाऊ मासाहेबांचा आदेश महाराज प्रमाण मानीत असत.हे सगळ शिवचरीत्र वाचल्यावर लक्षात येत.तर आजच्या पिढीकडे बघितले तर आईबापांचेही हिस्से करणारे आम्ही कसे ठरणार छत्रपतीच्या विचारांचे पाईक?छत्रपतीच्या सोबत असलेले मावळे निश्चयाने व जीव गेला तरी बेहतर पण एकनिष्ठ होते.आम्ही महाराजांच्या नावावर बावळ्यासारखी सोंगे घेणारी युवा पिढी याचा जयजयकार त्याचा जयजयकार करण्यातच मश्गुल होत चाललो आहोत.आम्ही शिवचरीत्राचा जर खरोखरच अभ्यास केला तर आम्हांस कळेल महाराजांची शिकवण…आदर्शवादी विचारसरणी…महाराजासाठी प्राणपणाला लावून कोंढणा किल्ला जिंकणा-या तानाजी मालुसरेच्या मुलाचे रायबाचे लग्न स्वतः महाराजानी उपस्थित राहून करुन दिले,केवढा हा माझा नितीवान राजा एका मावळ्याच्या मुलाचे लग्न आपल्या घरचेच समजून करुन देतो.आणि कुठे आम्ही कुणाचे जमणारे लग्नही गावातल्या चौकात बसून मोडून टाकतो.हिच ती अधोगतीची खरी कारण आहेत.आज साडेतीनशे वर्षानंतर अखंड हिंदुस्थानावर माझ्या राज्यांचा अधिराज्य व नाव याचसाठी आदराने घेतले जाते.न्यायप्रिय,नितीसंपन्न,थोर विचारसरणी असलेले माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आम्ही घरात लावतो.आणि स्वतःला छत्रपतीचे मावळे म्हणवितो.पण महाराजांचा एकही गुण व संस्कार आमच्यात आहे का?हे कधी आम्ही आमच्या मनाला विचारलेच नाही.फक्त आणि फक्त मतलब ,संधीसाधूसारखे आम्ही वागत आलोत.स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही आमच्या जवळच्याच माणसाशी दगलबाजी करुन प्रामाणिक व एकनिष्ठांना दुर ढकलले.मग आम्ही कसले शिवरायांच्या सच्च्या विचाराचे मावळे.त्यापेक्षा आमच्यात जोपर्यंत छत्रपतीचे विचार रुजत नाहीत,तोपर्यंत आम्ही खरे अर्थाने बावळेच आहोत! …चला तर मग आजपासून संकल्प करुया महाराजांच्या आदर्शवादी विचारसरणीवर वाटचाल करण्याचा.कारण मी तरी स्वतः मानतो की,माझ्या पोटात जाणारा प्रत्येक घास आणि माझ्या शरीरातून निघणारा प्रत्येक श्वास यावर फक्त आणि फक्त माझा बाप छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शवादी विचारांचाच पगडा कायम राहिल..म्हणूनच स्वाभिमानाने म्हणतो “आमचं दैवत छत्रपती”ज्यामुळे मी आज घेतोय मोकळा श्वास!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here