Home भंडारा संत सेवालाल महाराज मानवतावादी विचारवंत:- प्राचार्य :- राहुल डोंगरे (शारदा विद्यालय येथे...

संत सेवालाल महाराज मानवतावादी विचारवंत:- प्राचार्य :- राहुल डोंगरे (शारदा विद्यालय येथे प्रतिपादन)

63
0

आशाताई बच्छाव

1001244686.jpg

संत सेवालाल महाराज मानवतावादी विचारवंत:- प्राचार्य :- राहुल डोंगरे
(शारदा विद्यालय येथे प्रतिपादन)

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) संत सेवालाल महाराज खरे समाज सुधारक होते. राष्ट्राला बळकट बनविण्यासाठी जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा भेदभाव करू नका. सन्मानाने आयुष्य जगा .खोटे बोलू नका .स्त्रियांचा सन्मान करा. भुकेलेला अन्न द्या आणि गरजू लोकांना मदत करा. खऱ्या अर्थाने संत सेवालाल महाराज मानवतावादी विचारवंत होते. त्यांचे विचार देशासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले .ते शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक आर एम हरडे होते.यावेळी बंजारा नृत्य कु.यशस्वी ओंकार नवखरे हिने सादर केले. कु.आरुषी प्रल्हाद गाढवे आणि कु. श्रावणी विजय मोहतुरे हिने बंजारा भाषेत संवाद साधला.अमन सोनवाणे ,कुणाल वासनिक,विपशी बागडे,कादंबरी वैद्य,अथर्व धारंगे,चिन्मय भोयर,गुंजन बिसने,राशी साठवणे,लक्ष्मीकांत बाभरे आदीनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कु. लिझा दामोधर हेडाऊ आणि कु.माही महेंद्र मेश्राम हिने संचालन केले. कु. गायत्री प्रभाकर मोहतुरे हिने आभार मानले. पर्यवेक्षक ज्योती बालपांडे,दिपक गडपायले,श्रीराम शेंडे,संजय बावनकर, नितुवर्षा मुकुर्णे,सीमा मेश्राम,प्रीती भोयर, विद्या मस्के,अशोक खंगार,अंकलेश तिजारे,अतुल भिवगडे, सुकांक्षा भुरे,बेनिता रंगारी,आरती पोटभरे,पुनम बालपांडे, लक्ष्मीनारायण मोहनकर,दीपक बालपांडे, झनकेश्वरी सोनेवाणे, उषा दाते, कल्पना मानकर,बंदिनी खैरकर,विद्या देशमुख आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Previous articleमाहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा. आश्रम शाळेची सहल शिवनेरी,रायगड किल्लेवर
Next articleअमरावती उन्हाचा पारा वाढला असल्याने चल कोटासह टोप्यांची मागणी वाढली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here