आशाताई बच्छाव
माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा. आश्रम शाळेची सहल शिवनेरी,रायगड किल्लेवर
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 17/02/2025
दिनांक 6फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी ते समाधी स्थळ, किल्ले रायगड अशी काढण्यात आली होती. सहली दरम्यान विद्यार्थ्यांना शिर्डी देवस्थान, ओझर गणपती,आळंदी, देहू, कारला लेणी, लोणावळा, अलिबाग बीच, काशीद बीच, मुरुड जंजिरा, रायगड किल्ला, महाड, प्रतापगड, महाबळेश्वर,पांचगणी, प्रतिबालाजी, जेजुरी, मोरगाव, शनिशिंगणापूर, देवगड इ. ठिकाणी भेटी दिल्या. या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यावरण, डोंगर, दऱ्या, किनारे, समुद्र, किल्ले या बद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी देखील भ्रमंती चा आणि निसर्ग सौंदर्याने नाटलेल्या कोकण किनारपट्टीचा मनमुराद आनंद लुटला.सहली मध्ये विद्यार्थ्यांची सोबत मुख्याध्यापक श्री संदीप सिनगारे सर, श्री विजय चंदनशिव, श्री मोरेश्वर उबाळे, श्री शिवाजी गायकवाड सर, श्री दीपक वाघ सर, श्री संजीव वाघ सर, श्री सुनील डुकरे सर आदींनी नियोजन तसेच व्यवस्थापनाचे काम पहिले.दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सहल शाळेत परतली.