आशाताई बच्छाव
जवखेडा ठेंग येथील श्री जनेश्र्वर महादेव मंदिर येथे शिवपंचायतन यज्ञ सोहळा तिसऱ्या दिवशी ह.भ.प.श्रावण गीरी महाराज यांचे प्रवचन संपन्न
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 17/02/2025
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथे श्री शिवपंचायत यज्ञ सोहळा चालू आहे सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी जवखेडा ठेंग येथील श्री जनेश्र्वर संस्थान चे पिठाधिश ज्ञानेश्र्वर माऊली महाराज व गावकरी यांनी भावीक भक्तांसाठी जेवणाची मोठी व्यवस्था केली होती. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भावी भक्तांनी लाभ घेतला . रात्री 9 वाजे वाजेपर्यंत भविकांची गर्दी दिसून आली. शिवपंचायत यज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने तिसऱ्या दिवशी ह.भ.प.श्रावणगिरी महाराज यांचे प्रवचन सुद्धा ठेवण्यात आले होते. प्रवचन 8.30 वाजता चालु झाले . प्रवचनात बोलतांना आपल्या वाणीतून त्यांनी हनुमंतराय यांची महती सांगितली . तसेच प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील तसेच जवखेडा परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.