Home बुलढाणा मोठी बातमी ! ‘गोरक्षक बनले भक्षक ?’ – कृष्णाई गोशाळेच्या ४५ गोवंशांची...

मोठी बातमी ! ‘गोरक्षक बनले भक्षक ?’ – कृष्णाई गोशाळेच्या ४५ गोवंशांची कोंबून वाहतूक..! – ३ वाहनांसह १९ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त ! –

95
0

आशाताई बच्छाव

1001242256.jpg

मोठी बातमी ! ‘गोरक्षक बनले भक्षक ?’ – कृष्णाई गोशाळेच्या ४५ गोवंशांची कोंबून वाहतूक..! – ३ वाहनांसह १९ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त ! – गोशाळा मालक -भाजप नेत्याचा निकटवर्तीय !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर

बुलडाणा :-जळगाव जामोद तब्बल ४५ गोवंशांची कोंबुन विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी तीन आयशर वाहनांसह १९ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जळगाव जामोद पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. गोशाळा मालक भाजप नेत्याचा निकटवर्ती असल्याचे समजत आहे. त्यामुळे गोरक्षक भक्षक बनल्याचे संतापजनक चित्र दिसून येते.

१४ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० चे दरम्यान तीन
आयशर वाहनांमध्ये ४५ जनावरे विना परवानगी तसेच वाहनांमध्ये कोंबलेल्या स्थितीत पोलिसांना पिंपळगाव काळे येथे नाकाबंदी दरम्यान दिसून पिपळगाव काळ यय नाकाबदा दरम्यान दिसून आले आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी जनावरे वाहतूक प्रकरणी तीनही आयशर वाहनांकडे वाहतूक परवाना असल्याचे विचारणा केली असता तिन्ही वाहनचालकांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. यावेळी पिंपळगाव काळे येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये निळ्या व पांढऱ्या रंगाचे आयशर क्रमांक एमएच १८ बीए ४७०७, तपकिरी रंगाचे आयशर क्रमांक एमएच ३० बीबी २८२७ व एमएच ४२ टी १६६१ या तीन वाहनांमध्ये कृष्णाई गोशाळेच्या ४५ गाई कोंबलेल्या स्थितीत मिळून आल्या. यावरून तिन्ही वाहने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणण्यात आली होती. यावेळी घटनास्थळी नागरिकांच्या चर्चांना उधाण आले होते यामध्ये जळगाव जामोद गोवंश तस्करी वाढली हिंदू गाडी चालक “गोरक्षक” भक्षक असल्याची चर्चा रंगली! यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून तिन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली व तिन्ही वाहनाचे चालक आसिफ शेख युसुफ वय ३७ वर्ष राहणार साखळी तालुका यावल जिल्हा जळगाव खान्देश, वसंत रामकृष्ण म्हसाळ वय ५२ वर्ष राहणार गंगानगर जळगाव जामोद, अशोक पांडुरंग ढगे वय ५० वर्ष राहणार आचल नगर जळगाव जामोद यांच्यावर अप नंबर ८२/२०२५ कलम ११(१) (घ) (ड) (च) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० प्रमाणे सरकारतर्फे महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीतांवर गुन्हा दाखल केला असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here