आशाताई बच्छाव
पालक सचिव यांनी घेतला विकास कामाचा आढावा
· पालक सचिव पराग जैन यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा
जालना,दि.13(जिमाका) : माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव पराग जैन यांनी आज जालना येथे भेट देवून, जिल्ह्यातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी नियोजन करुन विकास कामे करावीत अशा सूचना पालक सचिव पराग जैन यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालक सचिव श्री. जैन हे बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. पठारे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, मनपा आयुक्त संतोष खांडेकर जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. कापसे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत श्री. जैन यांनी जिल्ह्यात झालेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच प्रत्येक विभागाचा आढावा घेत संबंधीत विभागाच्या समस्या जाणून घेतल्या. बैठकीच्या सुरुवातीस श्री. जैन यांनी प्रशासनाकडून जिल्ह्यात होणारे जालना ते जळगाव रेल्वे मार्ग, जालना ते नांदेड द्रूतगती महामार्ग, जालना खरपूडी (सिडको), पवित्र, ड्रायपोर्ट, प्रादेशिक मनोरुग्णालय, रेशीम उद्योग व हातमाग प्रशिक्षण केंद्र, मॅजीक इन्क्युबेशन सेंटर, मोसंबी-एक जिल्हा एक उद्योग, महादिप-एक संकल्प आदी प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. तसेच महसूल, कृषी, रेशीम, भूसंपादन, विभागाचे अधिकारी उपस्थित होते.