आशाताई बच्छाव
हा असा कसा बाप? स्वतःच्या मुलीला नको ते व्हिडिओ दाखवले अन् अब्रूचे लचके तोडले…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-जालना बाप लेकीचं नातं हे हळव नातं असतं.. लेकीच्या सुखासाठी बाप रात्रंदिवस कष्ट उपसतो.. तिला चांगलं शिक्षण उपसता.. तिला चागल शिक्षण
मिळावं म्हणून, तिला चांगला जोडीदार मिळावा म्हणून तो झटत असतो.. मात्र अशा या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या एका कुकर्मी बापाची कहाणी समोर आली आहे ती जालन्यातून… स्वतःच्या मुलीला मोबाईल मध्ये पॉर्न व्हिडिओ दाखवून त्या नराधमाने मुलीवर
बलात्कार केला आहे. त्यामुळे हा कसला बाप? असा प्रश्न परिसरातील प्रत्येकाच्या तोंडी आहे…
प्राप्त माहितीनुसार घटना जालन्यातील चंदनशीरा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
घटना जालन्यातील नवीन मोंढा भागातील हनुमान नगरातील आहे. तक्रारीनुसार पीडित मुलीची आई घरी नसताना मुलीचा बाप मुलीला मोबाईल मध्ये नको ते व्हिडिओ दाखवायचा. त्या व्हिडीओत जसे आहे तसे कृत्य मुलीकडून करून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. या घटनेची वाचता केल्यास गळा दाबून जीवाने मारून टाकण्याची धमकी देखील नराधम बापाने मुलीला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या घटनेबाबत पीडित मुलीने स्वतःच्या आईला सांगितल्यानंतर घटना उजेडात आली. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. स्वतः जालन्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.