आशाताई बच्छाव
परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांचा अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने सत्कार संपन्न!
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. त्रिंबक कांबळे साहेबांचा सत्कार अँड.मनोज संकाये यांच्या मित्र मंडळाच्या वतीने संपन्न झाला. अँड. मनोज संकाये यांनी केलेल्या प्रमुख मागण्या मान्य केल्याबद्दल आणि त्याचे काम पूर्ण केल्याबद्दल सत्कार संपन्न झाला. सामाजिक क्षेत्रात एक आग्रगण्य नाव म्हणून अँड.मनोज संकाये यांच्याकडे पाहिले जाते. परळीच्या विविध समस्यावर ते नेहमी आवाज उठवतात. नगरपालिकेने प्रभू वैद्यनाथ मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावर एक भव्य कमान उभारलेली आहे. या कमानीमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी यामुळे झाली आहे. त्याचबरोबर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोड नगरपालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात आला. या रोडमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत झाली असून नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच मेरुगिरी पर्वतावरून काढण्यात आलेला पर्यायी बायपास रोड यामुळे अवजड वाहनांचा प्रश्न निकाली लागला आहे. अशा विविध सामाजिक विषयाला त्यांच्या माध्यमातून न्याय मिळाल्याने हा सत्कार संपन्न झाला आहे. मुख्याधिकारी साहेब हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परळीच्या विकासासाठी त्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरली आहे. नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्यांच्या समस्यांना गांभीर्याने घेऊन ते पूर्णत्वाकडे नेण्याकडे त्यांचा कल असतो. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केले आहे. यावेळी नगरपालिकेचे नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे, अनिल चौधरी, शिरीष सलगरे, संदीप चौधरी, प्रदीप बुदे, अनिल कातकडे, कैलास रिकिबे, बाळू मुंडे, भागवत जोगदंड आदीसह मित्र मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.