आशाताई बच्छाव
सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘गांधी संस्कार’ स्पर्धेत यश
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 10/02/2025
नुकत्याच जाहीर झालेल्या ‘गांधी संस्कार’ स्पर्धेच्या निकालात सरस्वती माध्यमिक विद्यालय गोंदेगाव येथील विद्यार्थ्यांनी आपली यशाची परंपरा कायम राखत या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सरस्वती विद्यालयातील एकूण 216 मुलांनी या परीक्षेत आपला सहभाग नोंदविला होता. ‘गांधी संस्कार’ या परीक्षेत जालना जिल्ह्यातून हर्षल राजेश खरात इयत्ता 9 वी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळविला असून इयत्ता 8 वी तील विद्यार्थी सुरेश गणेश घोडके याने जालना जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री सचिन देशमुख सर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा. सचिन देशमुख सर, श्री डी. एम. बोरुळ, श्री व्ही. एस. दळवी, श्री के. व्ही. नवल, श्री आर. आर. वायाळ, श्री एस. ए. आमले, श्री रोहित बेंबडे, श्री एस . एम.शेळके, श्री डी.ए. वाघ, श्री व्हि..टी बोर्डे ,श्री आर .ए .साबळे, श्री एस.डी. दांडगे, श्री व्ही. पी. देशमुख, श्री एन. बी. कणखर, श्री य
एस.ए. दांडगे, श्री ए. एम. कोहिरे, श्री एस. पी. शिंदे, श्री नरेंद्र शिंदे, श्री जी. एन. डोंगरे, श्री पी.जी. पाटील, श्री अरुण लोखंडे ,श्री कळम, श्री शिवाजी मुळे, श्री बि.एफ.वाघ,श्रीमती देशमुख मॅडम, श्रीमती मगर मॅडम, श्री एस. जी. पवार, श्री एल. जी. वाघ, श्री भारत गळगुंडे यांसह सर्व शिक्षक -कर्मचारी हजर होते.