Home जालना माहोरा येथे रमाई जयंती मोठया उत्साहात साजरी

माहोरा येथे रमाई जयंती मोठया उत्साहात साजरी

29
0

आशाताई बच्छाव

1001218879.jpg

माहोरा येथे रमाई जयंती मोठया उत्साहात साजरी
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 10/02/2025

सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे दि. ७ फेब्रुवारी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई आंबेडकर यांची जयंती माहोरा येथील सम्राट अशोक बुद्ध विहीर येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सरपंच गजानन लहाने,सभापती चंद्रकांत चौतमोल,उपसरपंच बाबासाहेब बोरसे, समाज भुषण पुरस्कार प्राप्त शिवाजी गवई,नंदकिशोर बोर्डे,यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.नंतर महिलाच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,या नंतर समाज भुषण पुरस्कार प्राप्त शिवाजी गवई, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत रमाईंच्या संघर्षमय जीवनाची आणि बाबासाहेबांना दिलेल्या योगदानाची महती विषद केली. माजी सभापती चंद्रकांत चौतमोल यांनी माता रमाईंच्या त्यागातूनच बाबासाहेबांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्याला बळ मिळाल्याचे सांगितले.आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे,यांनी केले.
यावेळी राहुल बोर्डे,संदीप साळवे,किरण बोर्डे,नितीन इंगळे,विनोद दांडगे,रामधन बोर्डे,समाधान साबळे, महिला मंडळ,सामाजिक कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रमाईंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन शिक्षण व सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याचा संकल्प केला. माजी सभापती सौ.रमाताई चौतमोल,मायाताई बोर्डे, ग्रा.प. सदस्य संगिताताई बोर्डे, मालीका बोर्डे, प्रतिभा बोर्डे, संद्याताई बोर्डे, लताताई बोर्डे, सुरेखा चौतमोल, श्रीमती डोंगरदिवे, आदीनी संकल्प केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here