आशाताई बच्छाव
मर्डर ! इरल्यात रेती वाहतुकीचा बळी! – लोखंडी टामीने डोक्यात प्रहार ! – हप्तेखोरांचे रेतीत ‘हात काळे !’ – दोन आरोपी गजाआड ! –
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा
इरला पुलाच्या खाली धामणा नदीपात्रात उमेश साहेबराव फदाट यांचा 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हा घातपात असावा असे प्रथम दर्शनी दिसत होते. दरम्यान मृतकाच्या भावाने रेती वाहतुकीच्या कारणावरून खून झाल्याची पोलिसात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी वैभव ज्ञानेश्वर भोपळे 24, पवन
ज्ञानेश्वर बकाल 19 दोघे रा. बोरगाव फदाट ता. जाफराबाद जि. जालना या आरोपींना जेरबंद केले आहे.
मृतक उमेश फदाट बोरगाव फदाट या गावातीलच रेती वाहतुकीचा धंदा करणाऱ्या अंबादास कोलते यांच्या टिप्पर वर क्लीनर म्हणून काम करत होते. 7 फेब्रुवारी च्या रात्री बारा वाजता ते धामणा नदी पात्राकडे गेले होते. दरम्यान तेथे वैभव ज्ञानेश्वर भोपळे याच्याशी रेती वाहतुकीवरून त्यांचा काही वाद झाला. यावेळी पवन ज्ञानेश्वर बकालही तेथे हजर होते. दरम्यान हा वाद विकोपाला गेला आणि आरोपी वैभवने लोखंडी टामीने उमेश फदाट यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. त्यामुळे उमेश रक्तबंबाळ होऊन जागीच गतप्राण झाले. यावेळी दुसरा आरोपी पवन बकाल याने सांडलेल्या रक्तावर जेसीबीच्या साहाय्याने वाळू टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मृतकाच्या भावाने पोलिसात तक्रार दिल्यावरून दोघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
• यंत्रणेचे तोंडावर बोट हाताची जिल्ह्यात रेतीची वाहतूक सुसाट सुरू आहे. यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांचे रेतीत हात काळे होत असल्याने अनेक गुन्हे डोके वर काढत आहे. अवैध रेती उपसा व वाहतुकीच्या व्यवसायिक स्पर्धेतून रेतीमाफीयांनी अनेकांचा जीव घेतला आहे. रेती वाहतुकीचे आणखी किती बळी जाणार? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जालना जिल्ह्यातील मराठवाड्यातील जाफराबाद व बुलढाणा जिल्ह्यातील इरला येथून मोठ्या प्रमाणात रेती उपसा वाहतूक सुरू असून, याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष दिसून येत आहे.