आशाताई बच्छाव
_दिल्ली विधानसभेत भाजपचे सरकार आल्याने गडचिरोलीत जल्लोष;
फटाक्यांची आतीषबाजीने व गुलाल उधळून विजयी उत्सव साजरा …_*
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ– भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेत सत्ता काबीज केल्याने गडचिरोली शहरात उत्साहाचे वातावरण होते. या आनंदोत्सवाच्या निमित्ताने
भाजपच्या वतीने
इंदिरा गांधी चौकात भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी “भारतीय जनता पक्ष जिंदाबाद” नरेंद्र मोदीजी जिंदाबाद “भारतीय जनता पार्टीचा विजय असो “अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, माजी नगरसेवक तथा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे यांच्या कुशल नेतृत्वात विजयी जल्लोष उत्साहात साजरा करण्यात आला.
या विजयी उत्सवात महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, ज्येष्ठ नेते सुधाकरजी येनगंदलवार, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे,आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ.नितिनजी कोडवते,डाँ.चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री केशव निंबोड, तसेच विवेक बैस, संजय मांडवगडे,विनोद देवोजवार, अनिल करपे,विशाल हरडे,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, पल्लवी बारापात्रे, अल्का पोहणकर, बेबीताई चिचघरे, अविनाश विश्रोजवार, अर्चना चन्नावार, सिमा कन्नमवार, भुपेश कुळमेथे, सत्यजित सरदार, प्रशांत कोटगले,रविंद्र भांडेकर राकेश राचमलवार, मंगेश रणदीवे, सोमेश्वर धकाते,गुडु सरदार, हरीश माकडे, दीपक सातपुते,कोमल बारसागडे वैष्णवी डोंगरे, भारती खोब्रागडे , अंजली देशमुख, स्वाती चंदनखेडे,आखाडे आणि अन्य कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष करत पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा केला. या विजयामुळे संपूर्ण गडचिरोली शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे