आशाताई बच्छाव
कोल्हापूर येथील आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत छ. संभाजीनगर येथील जिनियस अबॅकस सेंटर ची विध्यार्थीनी कु. शिवांजली काकडे देशात तृतीय
कोल्हापूर (संजीव भांबोरे )कोल्हापूर येथे पार
पडलेल्या अत्यंत भव्यदिव्य अश्या प्रोएक्टिव्ह अबँकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५ स्पर्धे मध्ये छ. संभाजीनगर येथील जिनियस अबँकसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याची कमाल दाखवत विविध कैटेगिरीच्या रैंक वर उत्तुंग अशी झेप घेत यश संपादित केले आहे.स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण २४८० विद्यार्थी सहभागी झाले होते. ६ मिनिटांमध्ये दिल्या गेलेल्या पेपर मधील जवळपास १०० गणिते ऍक्युरेट सोडवण्याची स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये होती.हे शिव धनुष्य विद्यार्थ्यांनी अगदी लिलया पेलले. आणि आपली कामगिरी त्यांनी फते करून दाखवली. यामध्ये विशेष करून छ. संभाजीनगर येथील जिनियस अबँकसच्या क्लास मधील शिवांजली काकडे हिने भारतातून तृतीय क्रमांक पटकावला आणि तिला तब्बल दोन फूट उंच अशी छानशी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . यामध्ये छ. संभाजीनगर येथील जिनियस अबँकस क्लासला बेस्ट सेंटर अवॉर्ड २०२५ पारितोषिक पटकावले. तर आरोही साळुंखे हिने ई कॅटेगरी तुन तृतीय क्रमांक पटकविला तसेच आर्या माढेकर हिने चौथा, डी कॅटेगरी स्वामिनी राठोड 12 वा क्रमांक, ई कॅटेगरी आराध्या चिंधे 13 वा क्रमांक,एच कॅटेगरी धनश्री चव्हाण 12 वा क्रमांक, तसेच
बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी खालीलप्रमाणे अक्षरा राऊत, नंदिनी राठोड, दुर्गा माढेकर , राजवीर बेडवाल , सिद्धी c बोंडारे, रिद्धी बोंडारे इत्यादी विद्यार्थी या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व मोलाचे मार्गदर्शन संचालिका सौ. रुपाली शाम मुळे यांचे लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा क्लास तर्फे सत्कार ठेवण्यात आलेला आहे…… जिनियस अबॅकस, अशोकनगर छ. संभाजीनगर च्या संचलिका सौ. रुपाली शाम मुळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कंपनीचे डायरेक्टर गिरीश करडे सर, सारिका करडे मॅडम, अजय मण्यार सर, तसेच कंपनीच्या HOD तेजस्विनी सावंत मॅडम यांनीही अभिनंदन केले आहे.